राष्ट्रवादीने खिंडीत गाठले; चिडलेले शंभूराज देसाई म्हणाले....

शंभूराज देसाई Shambhuraj Desai आता पुढची पावले काय उचलणार याची उत्सुकता आहे.
Shambhuraj Desai, Ramraje Nimbalkar, Balasaheb Patil
Shambhuraj Desai, Ramraje Nimbalkar, Balasaheb Patilsarkarnama

सातारा : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे, त्याप्रमाणे सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत ही महाविकासअ आघाडीचे प्रतिबिंब दिसावे, अशी शिवसेनेची मागणी होती. पण, ऐनवेळी काय झाले ते कळालेच नाही. यापुढे शिवसेनेलाही स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल, आणि आम्ही ती निश्चित घेऊ, असा इशारा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या सर्वसमावेशक अशा सहकार पॅनेलमध्ये गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना सामावून घेतले जाणार अशी चर्चा होती. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही जिल्ह्यातील नेत्यांना तशी सूचना करून मंत्री देसाई यांना यावेळेस ॲडजेस्ट करा, अशी सूचना केली होती. पण, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी जिल्हा बँकेत महाविकासचा फॉर्म्युला न राबवता थेट भाजपच्या नेत्यांना सोबत घेऊन तब्बल अकरा जागा बिनविरोध केल्या. त्यामुळे काँग्रेस, शिवसेनेला जिल्हा बँकेपासून दूर ठेवले आहे. यावरून गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई संतप्त झाले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे.

Shambhuraj Desai, Ramraje Nimbalkar, Balasaheb Patil
कोणी कितीही गर्जना करू देत; जिल्हा बँकेत राष्ट्रवादीचेच पॅनेल येणार...

मंत्री देसाई म्हणाले, सर्वसमावेशक पॅनेलमध्ये मला डावलण्याचा हा विषय नाही. जसे महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आहे. तसेच सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे प्रतिबंब दिसावे अशी शिवसेनेने मागणी केली होती. तशे संकेत राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. पण, ऐनवेळी काय झाले आम्हांला माहित नाही. त्यामुळे यापुढे शिवसेनेला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल. ती आम्ही निश्चित घेऊ, असे मंत्री देसाईंनी नमूद केले.

Shambhuraj Desai, Ramraje Nimbalkar, Balasaheb Patil
उदयनराजे, शिवेंद्रराजेंना जमले, ते सहकारमंत्री, शशिकांत शिंदेंना का जमले नाही...

मंत्री देसाई म्हणाले, आपले बहुमत आहे. आपल्याबरोबरच जास्त मतदार आहेत. त्यामुळे असा एकतर्फा निर्णय जर कोणता पक्ष घेणार असेल तर आम्हांला देखील आमचे मार्ग मोकळा आहे. आगामी काळातील सर्व निवडणूका शिवसेना स्वतंत्र पद्धतीने लढेल. त्याबाबतचे धोरण ठरविले जाईल, असे शंभूराज देसाईंनी नमूद केले. जिल्हा बॅंकेची आता निवडणूक होत असली तरी ते निमित्त आहे. जिंकण्यासाठी शिवसेना लढेल. परंतु, या पुढं शिवसेना निश्चित धोरण ठरवत वाटचाल करेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com