

Kolhapur News: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा जिल्हाध्यक्ष 'साठी'तला नको, तर तरुण असावा, अपेक्षित सन्मान मिळत नाही. तीन वर्षात पक्षाला अपेक्षित कामगिरी नाही . नेतृत्व तयार करणाऱ्याला संधी द्यावी, अशी तक्रार आमदार शशिकांत शिंदे यांच्यापुढे कार्यकर्त्यांनी तक्रार करीत जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांना पदावरून बदलावे, अशी मागणी केली.
जिल्हाध्यक्ष पळणारा हवा, व्ही. बी. पाटील ज्येष्ठ आहेत, त्यांना प्रदेशस्तरावर स्थान द्यावे. या पदावर निष्ठावंत तरुणाला संधी द्यावी, अशा मागण्या त्यांनी केल्या. दरम्यान, या बैठकीला जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार उपस्थित नसल्याची चर्चा उपस्थितांमध्ये सुरू होती. याबाबत सुरुवातीलाच कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी व्ही. बी. पाटील हे पूर्वनियोजित बैठकीमुळे बाहेरगावी गेल्याचे व आर. के. पोवार हे आजारी असल्याने उपस्थित नसल्याचे स्पष्ट केले.
महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी आज कोल्हापूर जिल्ह्यातील व शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची बैठक राजर्षि शाहू सभागृह सर्किट हाऊस कोल्हापूर या ठिकाणी घेतली. यावेळी बोलताना आमदार अशशिकांत शिंदे यांनी सरकार विरोधात छोटी मोठे आंदोलने करून पक्षाची प्रतिमा पुन्हा एकदा निर्माण करण्यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावे. विलीनीकरणामुळे आलेली मरगळ झटकून आता कामाला लागावे. प्रत्येकाला त्याच्या कामाचे श्रेय दिले जाईल जे काम करणार नाहीत नुसते पदासाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांना बाजूला केले जाईल, असेही सांगितले.
जास्तीत जास्त मतदारसंघांमध्ये बी एल ओ यांची नियुक्ती करा, महाविकास आघाडी सन्मानाची वागणूक देईल याची दक्षता घेतली जाईल. पक्षाच्या वतीने सुद्धा आंदोलन केले जातील व महाविकास आघाडी म्हणून सुद्धा एकत्रित आंदोलन केली जातील त्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी सहभागी व्हा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरातून प्रचंड विरोध आहे नऊ तारखेच्या महामोर्चाला मी स्वतः कोल्हापूरमध्ये उपस्थित राहणार आहे असेही त्यांनी सांगितले.
कार्यकर्त्यांच्या भावना ऐकून घेत असताना आमदार शिंदे यांनी, जिल्हाध्यक्ष व्हीबी पाटील यांच्याबाबत लवकरच वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही आमदार शशिकांत शिंदे यांनी कार्यकर्त्यांना दिली .
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.