Sharad Pawar : आमचीच 'खरी राष्ट्रवादी' म्हणणाऱ्या तटकरेंचा शरद पवारांनी मोजक्या शब्दांतच विषय संपवला

Sharad Pawar Vs Ajit Pawar : आयोगानं अजित पवार गटाला खरी राष्ट्रवादी म्हणून मान्यता दिली. पण, त्यानंतरही 'खऱ्या' राष्ट्रवादीवरून वादविवाद सुरू आहे.
sunil tatkare sharad pawar
sunil tatkare sharad pawarsarkarnama
Published on
Updated on

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडून एक वर्षांचा कालावधी होत आहे. निवडणूक आयोगानं अजित पवारांकडे 'खरी राष्ट्रवादी' असल्याचा निकाल दिला. तर, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) असं नाव निवडणूक आयोगानं दिलं. पण, यानंतरही 'खऱ्या राष्ट्रवादी'वरून वाद सुरू आहे.

लोकसभा अध्यक्षपदी ओम बिर्ला यांची निवड झाल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि खासदार सुनील तटकरे यांनी स्वागत केलं होतं. यावेळी "'खऱ्या राष्ट्रवादी' काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित पवार यांच्या वतीनं तुमचं स्वागत करतो," असं तटकरेंनी ओम बिर्लांना उद्देशून म्हटलं होतं.

तर, "राष्ट्रवादी काँग्रेसचे 'खरे' संस्थापक शरद पवार ( Sharad Pawar ) यांच्या वतीनं तुमचं स्वागत करते," असं सुप्रिया सुळे म्हणाल्या होत्या. यानंतर आरोप-प्रत्यारोप सुरू झाले होते. याप्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं आहे. ते कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

sunil tatkare sharad pawar
Video Sharad Pawar : अर्थसंकल्पावर शरद पवार स्पष्टचं बोलले, 'लोकं विश्वास ठेवणार नाहीत'

शरद पवार म्हणाले, "खरी राष्ट्रवादी कुणाची हे जनतेनं सांगितलं आहे. आमचे दहापैकी आठ खासदार निवडून आले आहेत. एक जागेवर पिपाणी आणि तुतारीच्या फरकामुळे पराभव झाला आहे. नाहीतर दहापैकी 9 जागा निवडून आल्या असत्या."

sunil tatkare sharad pawar
Ajit Pawar Letter : लोकसभेत सुनेत्रा वहिनींचा पराभव का झाला? अजितदादांना कार्यकर्त्यानं सांगितली गावागावातील कथा

उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करावा, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. याबद्दल प्रश्न विचारल्यावर शरद पवारांनी म्हटलं, "आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. सामुहिक नेतृत्व हेच आमचं सूत्र आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com