Sharad Pawar News : "वंचित" सोबत आघाडीच्या प्रस्तावाबाबत शरद पवार म्हणाले..

Vanchit Bahujan Aghadi News : प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही,

Sharad Pawar,  Prakash Ambedkar
Sharad Pawar, Prakash Ambedkarsarkarnama
Published on: 
Updated on: 

Vanchit Bahujan Aghadi News : वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष यांची नुकतीच युती झाली आहे. महाविकास आघाडी 'वंचित'ला सामावून घेणार का, असा प्रश्न सध्या विचारण्यात येत आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (शनिवारी) स्पष्टीकरण दिले.

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. "शरद पवार भाजपचे आहेत," असे आंबेडकर म्हणाले आहेत. यावरुन अनेक नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. पवार कोल्हापुरात आज पत्रकार परिषदेत बोलत होते.


Sharad Pawar,  Prakash Ambedkar
kamal haasan News : मोठी बातमी : अभिनेता कमल हासन यांच्या MNM पक्षाचे काँग्रेसमध्ये विलिनीकरण..?

शरद पवार म्हणाले, "वंचित बहुजन आघाडीची ठाकरेंच्या शिवसेनेशी युती झाली आहे. वंचितसोबत आघाडीचा प्रस्ताव आमचा नाही, प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कुठलीही चर्चा झालेली नाही," 'ठाकरे गट आणि वंचित यांच्यात वाद आहे का मला माहित नाही,'असे पवार म्हणाले.


Sharad Pawar,  Prakash Ambedkar
BJP News : प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, असं बावनकुळे का म्हणाले..

महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला ३४ जागा मिळतील, असे इंडिया टूडे –सी वोटर ‘मूड ऑफ द नेशन’ या सर्वेक्षणात समोर आले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, " हे सर्वेक्षण दिशा दाखवणारे आहे. ही आकडेवारी खरं चित्र दाखवणारी आहे. पण बहुमताचा आकडा सत्ताधाऱ्यासोबत राहणार नाही. हे सर्वेक्षण राज्य सरकारची चिंता वाढविणारे आहे,"

"निवडणुका आल्यानंतर फोडाफोडी सुरु होते. अद्याप कुठल्याही जागावाटपाबाबत चर्चा नाही. लोकसभा, विधानसभा निवडणूक एकत्र होईल की नाही, हे आता सांगता येत नाही, " असे पवार म्हणाले. केंद्रीय तपास यंत्रणेचा गैरवापर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.