Phaltan Sharyu Factory Fraud: शरयू कारखाना फसवणूक; भाजपच्या नेत्याला घेतले पोलिसांनी ताब्यात

Sharyu Sakhar Karkhana: खोटी बिले सादर करून कारखान्याची सुमारे एक कोटी १४ लाख ९० हजार ३५८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे.
BJP Leader Vasant Lodha
BJP Leader Vasant Lodhasarkarnama
Published on: 
Updated on: 

-रमेश धायगुडे

Lonand Crime News : कापाशी ( ता. फलटण) येथील शरयु ॲग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्याच्या सुमारे एक कोटी १४ लाख रुपयांच्या फसवणूकप्रकरणी दोन जणांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अहमदनगर येथील भाजपचे जेष्ठ नेते आणि पंडित दीनदयाळ पतसंस्थेचे चेअरमन वसंत लोढा यांनाही ताब्यात घेण्यात आले आहे. तर अन्य दोघे फरार आहेत.

याबाबत लोणंद पोलिसांकडून police मिळालेली अधिक माहिती अशी, कापशी ( ता. फलटण) Phaltan येथील शरयू अॅग्रो इंडस्ट्रीज लि. या साखर कारखान्यात २०२१ पासून आजपर्यंत फॅब्रिक्स इंडस्ट्रीज तर्फे वसंत लोढा (रा.अहमदनगर) व ऍक्युरेट इंजिनिअरिंग अँड इरेक्शन यांचे तर्फे प्रसाद प्रभाकरण (आण्णा) (रा.सांगली) यांनी शासनाने व वेगवेगळ्या सरकारी निमसरकारी कंपन्यांचे खोटे दाखले व सही शिक्के असलेली कागदपत्रे सादर केली.

तसेच कारखान्यातील सीनियर इंजिनियर संतोष पोपटराव होले ( रा. जाधववाडी), ता. फलटण व चीप इंजिनियर महादेव भंडारे (रा. कराड),सिनिअर इंजिनिअर संजय मुळे ( रा. उंबरे) ता. पंढरपूर यांना हाताशी धरून त्यांच्याशी संगनमत करून त्यांना पैशाचे अमिष दाखवून नवीन काम न करता पूर्वीच्या असणाऱ्या मशिनरी व साहित्य पॅनल बॉक्स पाईप हे सर्व नवीन टाकले असल्याचे सांगितले.

नवीन काम केले असे भासवून त्यांनी कारखान्याकडे खोटी बिले सादर केली. तसेच कारखान्याची सुमारे एक कोटी १४ लाख ९० हजार ३५८ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. कारखान्याची फसवणूक केलेली रक्कम त्यांना वेळोवेळी मागणी करुनही त्यांनी कारखान्याकडे जमा केली नाही. त्यामुळे कारखान्याने या पाच जणांवर गुन्हा दाखल केला.

BJP Leader Vasant Lodha
Satara NCP News : युरोप दौऱ्यावरुन शशिकांत शिंदेंनी काढले संचालकांना चिमटे...

याबाबतची तक्रार शरयू कारखान्याचे संचालक अविनाश शिवाजी भापकर ( रा. आसू, ता. फलटण) यांनी लोणंद पोलिस ठाण्यात ( ता. २५) रोजी दाखल केली आहे. त्यानुसार लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल वायकर व त्यांचे सहकारी पोलिस फौजदार विशाल कदम, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, सर्जेराव सुळ, संतोष नाळे, संजय चव्हाण, विठ्ठल काळे यांनी अहमदनगर येथे जावून कोतवाली पोलिसांच्या मदतीने अहमदनगर मधील वसंत लोढा यांना ताब्यात घेतले.

लोणंद पोलिस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत त्यांची चौकशी सुरू होती. तर संतोष पोपटराव होले (सिनिअर इंजिनीअर) रा. जाधववाडी, ता. फलटण व महादेव अनंत भंडारे (चिफ इंजिनिअर) रा. कराड यांना काल रात्री अटक करून फलटण येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलिस कोठडी दिली आहे.

BJP Leader Vasant Lodha
Congress Leader join BJP : काँग्रेसला रामराम ठोकत संजय आयरेकरांचा भाजपात प्रवेश

तर फरार संजय अनिरूध्द मुळे, रा. उबंरे, ता.पंढरपूर व प्रसाद प्रभाकरण (अण्णा) रा. सांगली यांचा लोणंद पोलिस शोध घेत आहेत. विशाल वायकर व त्यांचे सहकारी यांनी सांगली येथे जावून प्रसाद प्रभाकरण (अण्णा) यांचा शोध घेवूनही ते पोलिसांना मिळून आले नाहीत. लोणंद पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक विशाल वायकर हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.