Shashikant Gade : दसरा मेळाव्याची परवानगी हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांनीच नाकारली

शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे ( Shashikant Gade ) यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार टीका केली.
Shashikant Gade
Shashikant GadeSarkarnama
Published on
Updated on

Shivsena : शिवसेना मागील 56 वर्षांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेत आहे. पाच ते सहा वेळा उच्च न्यायालयानेच या मेळाव्याला परवानगी दिली आहे. मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात सहज परवानग्या मिळाल्या. मात्र हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्या शिंदे-भाजप सरकारमध्ये परवानगी नाकारण्यात येणे हे दुर्दैवी आहे. उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला. अहमदनगर जिल्ह्यातील शिवसैनिक घटस्थापनेपासून उत्साहाने पायी दसरा मेळाव्यासाठी जाणार असल्याचे शिवसेनेचे अहमदनगर दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा. शशिकांत गाडे ( Shashikant Gade ) यांनी सांगितले.

Shashikant Gade
शशिकांत गाडे म्हणाले, नगर तालुका बाजार समितीचा भ्रष्टाचार जनतेसमोर आणा

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यास उद्धव ठाकरे यांना उच्च न्यायालयाने परवानगी दिली. या संदर्भात प्रा. गाडे 'सरकारनामा'शी बोलत होते. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील दहा हजार शिवसैनिक दहा दिवसांचा पायी प्रवास करत मुंबईला जाणार आहेत. उच्च न्यायालयाच्या आजच्या निर्णया नंतर शिवसैनिकांनी चितळे रस्त्यावरील शिवसेना कार्यालयासमोर फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला. यावेळी शिवसेना कार्यलय येथे जल्लोष करून फटाके फोडण्यात आले .यावेळी शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, अशोक दहिफळे, पप्पू भाले, महेश शेळके, पारुनाथ ढोकळे, प्रा. अंबादास शिंदे, प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

या प्रसंगी संभाजी कदम म्हणाले, शेवटी सत्याचा विजय होत असतो. आजच्या निर्णयामुळे सर्व शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण पहायला मिळाले आहे. पुढील काळात सुद्धा शिवसेना अधिक भक्कम व संकटावर मात करून पुढे जाईल असे मत त्यांनी मांडले.

Shashikant Gade
दसरा मेळावा : सत्य परेशान हो सकता है पराजित नही; उद्धव ठाकरेंचा दरारा कायम!

हिंदुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी सुरू केलेली दसरा मेळाव्याची परंपरा कायम राहिली आहे. न्यायालय आम्हाला न्याय देईल असा आम्हाला विश्‍वास होता.

- विक्रम राठोड, नेते, युवा सेना, अहमदनगर

सत्तेचा गैरवापर करून शिवाजी पार्क हायजॅक करण्याचा प्रयत्न शिवसेनेतील गद्दारांनी केला होता. त्यांना भाजपची फूस होती. न्याय देवतेवर आमचा विश्‍वास आहे. आम्हाला न्याय मिळाला. आता न भूतो न भविष्यती असा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होईल.

- अभिषेक कळमकर, माजी महापौर, अहमदनगर.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com