Kolhapur Politic's : त्यावेळी चक्क लिफ्टमध्येच नाव बदलले; शशिकांत पाटलांच्या वडिलांनाही कोल्हापूर जिल्हा बँकेत डावलण्यात आले होते

Shashikant Patil Chuyekar News : ‘गोकुळ’मध्ये राजकीय घडामोडी घडल्यानंतर शशिकांत पाटील चूयेकर हे दूध संघाचे अध्यक्ष होतील, हे जवळपास निश्चित झाले होते. गुरुवारी त्यांचे नाव संचालक मंडळाच्या समोर ठेवण्यात येणार होते.
Shashikant Patil Chuyekar-Anandrao Patil Chuyekar
Shashikant Patil Chuyekar-Anandrao Patil Chuyekar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 31 May : कोल्हापूर जिल्ह्याची अर्थवाहिनी असलेला गोकुळ दूध संघ मागील काही घडामोडींमुळे राज्यात चर्चेत आला आहे. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर ‘गोकुळ’मधील राजकीय हालचाली थंडावल्या आहेत. पण, गेल्या आठ दिवसांपासून ज्या संचालकांचे नाव अध्यक्षपदाच्या शर्यतीत होते. त्यात शशिकांत पाटील चुयेकर यांना मोठा धक्का बसला आहे. पण, ऐनवेळी डावलण्याचा प्रकार केवळ चुयेकर यांच्याबाबत घडलेला नसून यापूर्वी त्यांचे वडिल आनंदराव पाटील यांनाही जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाबाबत डावलण्यात आले हेाते. राजकीय शक्ती आणि नेत्यांची इच्छाशक्ती नसल्यामुळे आजवर दोन वेळा चुयेकर कुटुंबीयांना मिळणारा आनंद हिरावून घेण्यात आला आहे.

‘गोकुळ’मध्ये (Gokul ) राजकीय घडामोडी घडल्यानंतर शशिकांत पाटील चूयेकर (Shashikant Patil Chuyekar) हे दूध संघाचे अध्यक्ष होतील, हे जवळपास निश्चित झाले होते. गुरुवारी त्यांचे नाव संचालक मंडळाच्या समोर ठेवण्यात येणार होते. पण, आदल्या दिवशी राजकीय हालचाली गतिमान झाल्याने त्यांना अध्यक्षपदापासून दूर जावे लागले. या गोष्टींची काहीशी कल्पना नसल्याने शशिकांत पाटील चुयेकर यांनी स्वागताची तयारी केली होती.

फाट्यापासून घरापर्यंत रस्त्याची स्वच्छता करण्यात आली होती. स्वागत कमानी कोठे कोठे उभा करायच्या? याचेही नियोजन झाले होते. सकाळी दारात छोटा मंडप उभा केला. रात्रीत बिर्याणी पार्टीचे नियोजन देखील झाले होते. पण, दुर्दैव असं की शशिकांत पाटील चूयेकर यांचे नाव रात्रीत बदलले. गोकुळ दूध संघाचे संस्थापक आनंदराव पाटील-चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत यांच्या वाट्याला आज निराशा आली. स्वतःच्या वडिलांनी उभा केलेल्या संघात आपले असे काहीच मत नसल्याचे पाहून त्यांचे डोळे पाणावले होते.

काही वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्हा बँकेतही (Kolhapur DCC Bank ) आनंदराव पाटील यांना जिल्हा बँकेचे अध्यक्षपद मिळेल, हे निश्चित झाले होते. विश्रामगृह येथे अध्यक्ष निवडीची बैठकही पार पडली. एका माजी अध्यक्षाने त्यावेळच्या जिल्ह्याच्या नेत्याकडे नाव जाहीर करण्याची धुरा होती. या बैठकीत आनंदराव पाटील यांचे नाव निश्चित झाले होते. बंद लिफाफ्यात त्यांचे नाव जिल्हा बँकेत घेऊन गेले. शासकीय विश्रामगृहावर नाव निश्चित झाल्यानंतर चुयेकर यांचे समर्थक जिल्हा बँकेत येऊ लागले. तेव्हा शर्यतीत ग्रामीण भागातील माजी आमदार होते.

Shashikant Patil Chuyekar-Anandrao Patil Chuyekar
Maratha Kunbi Sarpanch : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला मोठे यश; तुळजापुरातील कुंभारीत झाल्या पहिल्या मराठा कुणबी सरपंच!

अखेर लिफ्टमधून बँकेत जाताना त्या नेत्याने नाव बदलून स्वतःचेच नाव जाहीर केले. त्यामुळे सच्चा कार्यकर्ता असलेल्या आनंदराव पाटील यांचे नाव मागे पडले. अशीच काहीशी स्थिती आज त्यांचे चिरंजीव शशिकांत पाटील यांच्यासोबत झाली. येथे नेत्याचे नाव नव्हते; मात्र त्यांच्या चिरंजीवाचे नाव पुढे आले. दुपारी गोकुळ संघात आनंदराव पाटील-चुयेकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

Shashikant Patil Chuyekar-Anandrao Patil Chuyekar
Laxman Hake : लक्ष्मण हाके अजित पवारांवर बरसले : अजितदादा हा पोल्ट्री चालवणारा माणूस; पण त्यांना कायम अर्थमंत्रिपद का पाहिजे असते?

त्याचवेळी त्यांचे चिरंजीव शशिकांत यांच्या वाटेला मात्र निराशा आली. त्यांच्यासोबत असलेल्या सच्चा कार्यकर्त्याच्या पोटातील ओठावर आले आणि तिखट प्रतिक्रिया त्याने दिली. तरीही शशिकांत पाटील यांनी त्यांना सावरून माझ्या वडिलांनी दूध उत्पादकांसाठी खूप काही केले आहे. मीही दूध उत्पादकांसाठी सर्वांना सहकार्य करणार आहे, असे सांगून अश्रू आवरत काढता पाय घेतला.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com