Satara Politics : धनुष्य-बाणाने कमळाच्या पाकळ्या उद्ध्वस्त : एकनाथ शिंदे, शंभुराज देसाईंनी जयकुमार गोरेंच्याविरोधात घरातील माणूस फोडला

Satara Political News : राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना घरचा आहेर देण्यासाठी त्यांचे प्रतिस्पर्धी सज्ज झाले आहेत.
Eknath shinde, shmbhuraj desai, jaykumar gore
Eknath shinde, shmbhuraj desai, jaykumar gore Sarkarnama
Published on
Updated on

रुपेश कदम

Satara News : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीची सध्या लगभग सुरु आहे. त्यामुळे जिल्ह्यात वेगवान घडामोडी घडत आहेत. त्यातच आता राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना घरचा आहेर देण्यासाठी त्यांचे प्रतिस्पर्धी सज्ज झाले आहेत. चार महिन्यापूर्वी झालेल्या सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला होता. मात्र, संधी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभुराज देसाईंनी जयकुमार गोरेंच्याविरोधात घरातील माणूस फोडला आहे. त्यामुळे आता येत्या काळात सातारा जिल्ह्यातील समीकरण बदलणार असल्याने सर्वांचे लक्ष या सर्व राजकीय घडामोडीकडे लागले आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेंना यांचे सख्खे बंधू शेखर गोरे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्तही ठरला असून १ सप्टेंबरला मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेखर गोरे यांनी भाऊ व मंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधात शिवसेनेच्याच चिन्हावर माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती.

शेखर गोरे यांनी सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काम केले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जयकुमार गोरे यांच्या विरोधात माण विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला असला, तरी त्यांनी मोठी राजकीय चुरस निर्माण केली होती.

Eknath shinde, shmbhuraj desai, jaykumar gore
Satara Politic's : मंत्री जयकुमार गोरेंच्या बंधूंनी पुन्हा शड्डू ठोकला; 'आपल्यामुळे अनेकांनी गुलाल उधाळला; आता ताकदीने लढणार...'

त्यानंतर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतच्या चर्चेनंतर शेखर गोरे यांनी माण खटावमधून माघार घेतली होती. त्यावेळी त्यांना आमदारकीचा शब्द दिल्याची चर्चा होती. त्यामुळेच त्यांनी विधानपरिषद निवडणुकीवेळी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र, जयकुमार गोरे यांनी आपल्या बंधूऐवजी पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांना तिकिट मिळवून देत विजयाचा गुलाल उधळला होता. त्यामुळे शेखर गोरे गेल्या काही दिवसांपासून नाराज होते.

त्यातच सातारा जिल्हा बँकेची निवडणूक लढण्याची तयारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. त्यासाठी त्यांनी भाजपचे पॅनेल जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत उतरवण्याची तयारी सुरु केली आहे. त्यातच, बंधू शेखर गोरे यांनी पुन्हा एकदा जिल्हा बँकेची निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे आपल्यामुळे अनेकांनी गुलाल उधळला आहे. आता जिल्हा बॅंकेची निवडणूक मी स्वतः ताकदीने लढणार आहे, असे शेखर गोरे यांनी काही दिवसापूर्वीच स्पष्ट केले होते.

शेखर गोरे हे सोसायटी मतदारसंघातून पुन्हा नशीब अजमावण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्याच माण खटावचे आमदार जयकुमार गोरे हे कुठल्या मतदारसंघातून निवडणूक लढविणार, याची उत्सुकता आहे. शेखर गोरे यांनी मागील निवडणुकीत सर्वच पक्षाचे लोक विरोधात असतानाही जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली होती, त्यामुळे त्यांचा कॉफिन्डन्स वाढलेला आहे.

Eknath shinde, shmbhuraj desai, jaykumar gore
Shambhuraj Desai : सातारा जिल्हा बॅंकेबाबत भाजपचा स्वबळाचा नारा; ZPत धक्काबुक्की झालेल्या शंभूराज देसाईंची 'वेट अँड वॉच'ची भूमिका

त्यातच आता संधी मिळताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री शंभुराज देसाईंनी जयकुमार गोरेंच्याविरोधात घरातील माणूस फोडला आहे. त्यांचे बंधू शेखर गोरे १ सप्टेंबरला मुंबईत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यातील सत्तासमीकरण बदलणार आहे. त्यामुळे या सर्व घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com