Madha Politics : चक्रव्यूहात अडकलेल्या बबनदादा शिंदेंनी कोंडी फोडली; तीनही बंधू आले एकत्र

Assembly Election 2024 : माढा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे यांना घरातूनच आव्हान मिळाले होते, त्यांचे बंधू रमेश शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती.
Sanjay Shinde-Baban Shinde-Ramesh Shinde
Sanjay Shinde-Baban Shinde-Ramesh ShindeSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 08 October : सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चक्रव्यूहात सापडलेले आमदार बबनराव शिंदे यांना कोंडी फोडण्यात यश आले आहे. घरातील वाद मिटवून माढ्यातील शिंदे कुटुंबीय पुन्हा एकदा एकत्र आले आहेत.

माढा तालुक्यातील बारलोणी गावात झालेल्या मेळाव्यात आमदार संजय शिंदे, आमदार बबनराव शिंदे आणि रमेश शिंदे हे तीनही बंधू एकाच व्यासपीठावर आले होते. विशेष म्हणजे रमेश शिंदे यांनी घरातील वाद मिटवून बबनदादा शिंदे यांच्या पाठीशी उभी राहण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे माढ्याचे राजकारण पुन्हा एकदा रंजक बनले आहे.

माढा विधानसभा निवडणुकीत आमदार बबनदादा शिंदे (Babanrao Shinde) यांना घरातूनच आव्हान मिळाले होते, त्यांचे बंधू रमेश शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवण्याची तयारी चालवली होती. पवारांकडूनही धनराज शिंदे यांना ताकद देण्यात येत होती.

आमदार बबनराव शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे यांनी माढा तालुक्यात (Madha Taluka) प्रचार दौरे हे सुरू केले होते. त्यांच्या सभांना तालुक्यातील युवा वर्गांचा प्रतिसादही उत्स्फूर्तपणे मिळत होता. मात्र, दुसरीकडे मुरब्बी राजकारणी बबनदादा शिंदे हे घरातील वाद मिटवण्यासाठी डावपेच टाकत होते. आणि त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून हे तीनही शिंदे बंधू एकत्र आले आहेत‌.

Sanjay Shinde-Baban Shinde-Ramesh Shinde
CM Solapur Tour : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द

घरातून आव्हान मिळालेल्या बबनदादा शिंदे यांनी लोकसभा निवडणुकीतील बदलते वारे पाहून काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही साथ सोडण्याचे जाहीर केले होते. आपल्या मुलाला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली तर ठीक नाही; तर आम्ही मुलगा रणजितसिंह शिंदे यांना अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे एकीकडे पक्षीय राजकारणातून बाजूला गेलेले बबनदादांनी घरातील वाद मिटवून सर्वांना एकत्रित आणण्यात यश मिळवले आहे.

यासंदर्भात आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू रमेश शिंदे म्हणाले, आमचे मोठे बंधू बबनराव शिंदे यांची तब्येत सध्या ठीक नसते. त्यामुळे आमच्यासाठी पहिले कुटुंब महत्वाचे आहे आणि त्यानंतर राजकारण. आम्ही राजकारणात सध्या थांबण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रमेश शिंदे यांचे चिरंजीव धनराज शिंदे हे वडिलांचा आदेश मानणार का, हा आता खरा सवाल आहे.

Sanjay Shinde-Baban Shinde-Ramesh Shinde
Beed Politics : कमळाचं देठ खुडून निवडणूक लढविणार नाही म्हणणारे, भाजप आमदार 'तुतारी'च्या संपर्कात

दुसरीकडे आमदार बबनराव शिंदे यांच्या मुलाचे संभाव्य प्रतिस्पर्धी अभिजीत पाटील यांनी मात्र हे सर्व शिंदे बंधू एकत्रच आहेत. ते यापूर्वीही एकत्र होते आणि आताही एकत्र आहेत. मात्र, शिंदे बंधूंच्या एकत्र येण्याचा काहीही इफेक्ट होणार नाही, असेही स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com