CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar
CM Uddhav Thackeray, Sanjay PawarSarkarnama

शिवसेना देणार ज्येष्ठांना धक्का? राज्यसभेसाठी संजय पवारांच्या नावाची चर्चा

माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा राज्यसभेसाठी शिवबंधन हाती बांधण्यास नकार असल्याचे समजते.
Published on

कोल्हापूर : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांचा राज्यसभेसाठी शिवबंधन हाती बांधण्यास नकार असल्याचे समजते. त्यामुळे आता शिवसेनेकडून उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण आता कोल्हापूरातीलच संजय पवार हे नाव अचानक चर्चेत आलं आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वांनाच धक्का देण्याची शक्यता आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस वाढली आहे. संभाजीराजेंनी अपक्ष उभे राहण्याची घोषणा करत सर्व पक्षांना पाठिंबा देण्याची विनंती केली होती. पण संख्याबळानुसार पहिल्या पसंतीची सर्वाधिक अतिरिक्त मते शिवसेनेकडे उरतात. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेना पुरस्कृत उमेदवार व्हावे, असा प्रस्ताव देण्यात आला होता. (Shiv Sena Leader Sanjay Pawar may be the Rajya Sabha Candidate)

CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar
विधान परिषदेची दहावी जागा कुणाला? गुप्त मतदानामुळे आघाडीसमोर आव्हान...

संभाजीराजेंनी त्यावर अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पण ते अपक्ष म्हणूनच उमेदवारी अर्ज भरतील, अशी दाट शक्यता आहे. त्यामुळे शिवसेनेकडून सहाव्या जागेसाठी उमेदवाराचा शोध अंतिम टप्प्यात आल्याचे सांगितले जात आहे. त्यासाठी माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवाजीराव आढळराव पाटील, मुख्यमंत्र्याचे खासगी सचिव मिलिंद नार्वेकर, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावांची चर्चा होती. आता त्यामध्ये संजय पवार हेही नाव चर्चेत आलं आहे.

कोण आहेत संजय पवार?

संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पवार हे मागील 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. संभाजीराजे यांनी नकार दिल्याने कोल्हापूरातीलच उमेदवार देण्यावर शिवसेनेच गांभीर्याने विचार सुरू आहे. त्यासाठी संजय पवार यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. नेत्यांशी दांडगा संपर्क असलेले संजय पवार ग्रामीण भागातील असून शिवसेनाही ग्रामीण चेहऱ्याच विचार करत आहे.

CM Uddhav Thackeray, Sanjay Pawar
संभाजीराजे यांना एकमेव आधार उरला तो मित्र मानलेल्या फडणविसांचा!

दबाव वाढवण्याचा प्रयत्न

दरम्यान, राज्यसभेत जाण्यासाठी इच्छुक असलेल्या छत्रपती संभाजीराजे यांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी आता मराठा संघटनांनी (Maratha organisation) व्‍यूहरचना करण्‍यास सुरुवात केली आहे. संभाजीराजे यांना अपक्ष म्हणून पाठिंबा देण्यास नकार दिल्याचा सेनेला राजकीय फटका बसेल, असे हे समर्थक सांगत आहेत. मराठा समाज सेनेच्या विरोधात जाऊ शकतो, अशी मांडणी हे कार्यकर्ते करत आहेत. त्यासाठी सेनेतील मराठा नेत्यांना, आमदारांना भेटून ते भूमिका मांडत आहेत. अर्थात त्यांच्या दबावाला पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कितपत प्रतिसाद देणार याची साशंकता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com