Ajit Pawar : ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनाही अजितदादांची मोहिनी; मशाल सोडून घड्याळाचा प्रचार

Shivsena UBT News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार करताना दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून संभाव्य आघाडी बदलाबाबत तर्कवितर्क सुरू झाले आहेत.
Ajit Pawar-Ashok Khandebharad
Ajit Pawar-Ashok Khandebharad
Published on: 
Updated on: 

Pune, 29 January : पुणे जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अशोकराव खांडेभराड हे जाहीर सभांमधून चक्क राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांच्या अचानक बदलेल्या या भूमिकेने तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष (Shivsena UBT) हा महाविकास आघाडीचा एक भाग आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) हा महायुतीचा भाग आहे .दोन्ही राजकीय आघाड्या वेगळ्या असतानाही खांडेभराड यांच्याकडून राष्ट्रवादी पक्षाचा प्रचार केला जात आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळातून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

वराळे येथे झालेल्या शोकसभेत अशोकराव खांडेभराड यांनी आंबेठाण-पाईट गटातील राष्ट्रवादीचे तीन उमेदवार आणि नाणेकरवाडी-महाळुंगे जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) तीन उमेदवार यांना विजयी करण्याचे आवाहन केले. त्यांना विजयी केले तर ती अजितदादांना श्रद्धांजली ठरेल, असेही त्यांनी सांगितले.

अशोक खांडेभराड यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असून त्यांच्या पक्षाचे चिन्ह मशाल आहे. मात्र, ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाचा प्रचार कसा काय करतात? याचे उत्तर मात्र गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे खांडेभराड हे त्यांच्या पक्षाचे जिल्हाप्रमुख आहेत.

दरम्यान, अशोक खांडेभराड यांचा राजकीय प्रवास सुरुवातीला एकत्रित शिवसेना असा होता. त्यानंतर त्यांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये प्रवेश केला. त्यानंतर ते आता उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत आले होते.

मागील एक वर्षाच्या काळात आमचा भ्रमनिरास झाला आहे. खेड तालुक्यात कुठल्याही प्रकारची विकासकामे झालेली नाही. मी राष्ट्रवादीत यावे हा अजितदादांचा आग्रह होता, त्यामुळे अजितदादांच्या विचाराने प्रेरित होऊन माझ्याकडे महत्त्वाचे पद असतानाही मी जिल्हाप्रमुख पक्षाचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीने जाण्याचा निर्णय घेतला आहे, असे अशोक खांडेभराड यांनी म्हटले आहे.

जाहीर कार्यक्रमात खांडेभराड सांगतात की दादांनी स्व:पक्षाबरोबरच विरोधकांनाही आपलेसे केले आहे. तालुक्यातील अनिष्ट प्रथांना आळा घालण्यासाठी मी जिल्हाप्रमुख पदाचा त्याग केला आहे. पुण्याचे वैभव अजितदादांनी वाढविले; म्हणून मी पक्ष सोडला आहे. येत्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com