Shiv Sena UBT: नाव उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे, नगरसेवक काँग्रेसचे, संपर्कप्रमुखांकडे शिवसैनिकांची तक्रार

Shiv Sena UBT workers complained about corporator: कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या कार्यकर्त्यांनी स्वीकृत नगरसेवक सुनील मोदी यांच्या कारभाराबाबत संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्याकडे तक्रारी केल्या. काँग्रेसच्या कार्यक्रमातील उपस्थितीवरून शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त केली.
Kolhapur municipal elections result; shivsena UBT Sunil Modi
Kolhapur municipal elections result; shivsena UBT Sunil Modi sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur Politics : कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातील गटबाजीचे गृहण संपण्याचे नाव घेत नाही. जिल्हाप्रमुख यांचे फेरबदल झाल्यानंतर आता स्वीकृत नगरसेवकांच्या कारभाराविषयी निष्ठावंत शिवसैनिकांनी थेट संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्यासमोर तक्रारीचा पाढा वाचला आहे. नाव शिवसेनेचे वापरून महापालिकेत गेले. शिवसेनेच्या कोणत्याच उपक्रमाला उपस्थित लावत नसून ते काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात उपस्थित असतात. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याच्या तक्रारी दूधवडकर यांच्यासमोर व्यक्त केल्या.

तत्कालीन, जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले, शहराध्यक्ष शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी महापालिका निवडणुकीत शिवसेनेने महाविकास आघाडीचे नेतृत्व केले होते. मात्र अपेक्षित जागा न मिळाल्याने अनेक शिवसैनिकांनीं नाराज होऊन पक्षाच्या विरोधातच लढण्याची भूमिका घेतली होती. त्याचा फटका पक्षासह महाविकास आघाडीला बसला होता. त्यावेळी शहरप्रमुख मोदी देखील निवडणूक लढण्यास आग्रही होते. मात्र अंतर्गत तडजोडी मुळे त्यानी माघार घेतली.

पुढे महापालिका निवडणुकीनंतर मोदी यांनी शहरप्रमुख पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काही दिवसात स्वीकृत नगरसेवक निवडीत काँग्रेसकडून त्यांना महापालिकेत पाठवण्यात आले. यां निवडीनंतर शिवसैनिकांचा असंतोष बाहेर पडला होता. त्यानंतरही मोदी हे आपण शिवसेनेचे प्रतिनिधी असल्याचे जाहीरपणे आणि समाजमाध्यमातून सांगत असल्याचे दिसून आले.

Kolhapur municipal elections result; shivsena UBT Sunil Modi
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा धक्का! रशियन तेलावर अमेरिकेची 100% टॅरिफची धमकी! भारतावर काय होणार परिणाम?

आज संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर हे कोल्हापूर दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी कोल्हापुरातील सर्व पदाधिकाऱ्यांकडून आणि शिवसैनिकांकडून आढावा घेतला. यावेळी नगरसेवक मोदी यांच्याबदल काही जणांनी खासगीत तक्रारी केल्या. शिवसैनिक असो वा वरिष्ठ पदाधिकारी त्याला शिवसेनेमध्ये मातोश्रीचा आदेश पाळावा लागतो. मात्र गेल्या काही दिवसामध्ये नगरसेवक मोदी यांनी शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमांमध्ये अनुपस्थिती राहीली आहे. मात्र काँग्रेसच्या प्रत्येक कार्यक्रमात ते उपस्थिती लावत असल्याच्या तक्रारी दूधवडकर यांच्याकडे करण्यात आल्या. त्यामुळे ते नेमके कोणाचे नगरसेवक आहेत. हे एकदा जाहीर करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, याबाबत दुधवडकर यांनी, सुनील मोदी हे कार्यक्रमामुळे येऊ शकले नाहीत. ते शिवसेना पुरुस्कृत काँग्रेसचे नगरसेवक आहेत. ते बाहेर जाणार असल्याची त्यांनी कल्पना दिली आहे. पण त्यांना ताकीद दिली असल्याचे दूधवढकर यांनी स्पष्ट केले.

Kolhapur municipal elections result; shivsena UBT Sunil Modi
धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेला कधी व कसं मिळालं? काय आहे इतिहास..

दरम्यान महानगरपालिकेने जाहीर केलेल्या पाणी दरवाढीबाबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही आक्रमक झाली आहे. महानगरपालिका अकार्यक्षम आहे. शहरातील पाणी गळती रोखण्यात महापालिकेची यंत्रणा अपयशी आहे. शिवाय बोगस नळधारकांवर कारवाई करण्याचे धाडस महानगरपालिकेचे आयुक्त महापौर दाखवत नाहीत. जर यांच्यावर कारवाईचे धाडस दाखवले तर पाणी बिलातून महापालिकेचे उत्पन्न वाढेल. मात्र तसे न करता सर्व सामान्य यावर याचा बोजा लादला जात आहे. या विरोधात आवाज उठवण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढणार असल्याचं जिल्हाप्रमुख विराज पाटील यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com