Shivaji University : कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाला मिळाले नवे कुलगुरु : राज्यपालांनी 28 उमेदवारांमधून केली अनुभवी व्यक्तीची निवड

Shivaji University : राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी डॉ. आर. के. कामत यांची शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.
Dr R K Kamat appointed as the new Vice Chancellor of Shivaji University after a selection process involving 28 shortlisted candidates.
Dr R K Kamat appointed as the new Vice Chancellor of Shivaji University after a selection process involving 28 shortlisted candidates.Sarkarnama
Published on
Updated on

Shivaji University : तब्बल 9 महिन्यांनी शिवाजी विद्यापीठाला नवे कुलगुरु मिळाले आहेत. राज्यपाल तथा कुलपती जिष्णू देव वर्मा यांनी डॉ. आर. के. कामत यांच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. 115 अर्जदारांमधून 28 उमेदवारांची छाननी आणि अंतिम टप्प्यातील 5 जणांच्या मुलाखतीनंतर अनुभवी प्रशासकीय आणि शैक्षणिक कारकीर्द असलेल्या कामत यांची निवड करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या कुलगुरुपदासाठी गुरुवारी (14 मे) राज्यभवन येथे अंतिम मुलाखती पार पडल्या. या प्रक्रियेत शिवाजी विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. आर. के. कामत, शिवाजी विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव, नागपूर विद्यापीठातील डॉ. स्मिता देशमुख आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. संजय ढोले यांचा समावेश होता.

मुलाखतीनंतर कुलपती कार्यालयाकडून डॉ. कामत यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. डॉ. आर. के. कामत हे शिवाजी विद्यापीठाचे चौदावे कुलगुरू ठरले आहेत. यापूर्वी त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या अधिकार मंडळावर काम केले असून, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती. तंत्रज्ञान विभागातील त्यांच्या कार्याचा देखील मोठा अनुभव आहे. शैक्षणिक प्रशासनातील अनुभव आणि विद्यापीठ व्यवस्थापनातील समन्वयक भूमिका यामुळे त्यांची निवड महत्त्वाची मानली जात आहे.

Dr R K Kamat appointed as the new Vice Chancellor of Shivaji University after a selection process involving 28 shortlisted candidates.
Satara Sangli MLC: विधानपरिषदेसाठी साताऱ्यात मोठी घडामोड; उदयनराजे अन् गोरेंनी घेतली CM फडणवीसांची भेट; सुचवली वेगवेगळी नावं

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरुपद मागील 9 महिन्यांपासून रिक्त होते. तत्कालीन कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांचा कार्यकाळ 6 ऑक्टोबर 2025 रोजी संपल्यानंतर पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता. त्यानंतर कुलगुरू शोध समितीकडून अर्ज मागवण्यात आले होते. 23 डिसेंबर 2025 ते 27 जानेवारी 2026 या कालावधीत तब्बल 115 अर्ज प्राप्त झाले होते.

Dr R K Kamat appointed as the new Vice Chancellor of Shivaji University after a selection process involving 28 shortlisted candidates.
Congress organizational changes : सचिन चव्हाणांना शहराध्यक्ष पदावरून हटवून 'या' नेत्याला संधी; काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी पुन्हा सतेज पाटील

फेब्रुवारीमध्ये अर्जांची छाननी करून 28 उमेदवारांची निवड करण्यात आली. त्यानंतर एप्रिल महिन्यात प्राथमिक मुलाखती पार पडल्या. अंतिम फेरीसाठी पाच उमेदवारांची निवड करून 14 मे रोजी राज्यभवन येथे मुलाखती घेण्यात आल्या आणि अखेर डॉ. आर. के. कामत यांच्या नियुक्तीची घोषणा करण्यात आली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com