Satara Sangli MLC: विधानपरिषदेसाठी साताऱ्यात मोठी घडामोड; उदयनराजे अन् गोरेंनी घेतली CM फडणवीसांची भेट; सुचवली वेगवेगळी नावं

MLC News: सातारा आणि सांगली मतदारसंघांमध्ये जवळपास 853 इतके मतदार आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील 438 पैकी भाजपाकडे 222 सदस्य आहेत. तर सांगलीत भाजपचे अंदाजे 95 सदस्य आहेत.
MLC Election   (1).jpg
MLC Election (1).jpgSarkarnama
Published on
Updated on

Satara News: स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सातारा सांगली मतदारसंघांमध्ये हालचालींना वेग आला आहे. अशातच महायुतीचा उमेदवार कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

सातारा आणि सांगलीमध्ये भाजपचे प्राबल्य असल्याने भाजपकडून या मतदारसंघावर दावा केला जात आहे. मात्र, उमेदवार साताऱ्याचा असणार की सांगलीचा असणार? याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली आहे.

अशातच उमेदवारीवरून भाजपमध्ये स्पर्धा लागल्याची चित्र आहे. सातारा सांगली मतदार संघासाठी भाजप खासदार उदयनराजे भोसले आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी परस्पर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनी आपले निकटवर्तीय सुनील काटकर तर मंत्री गोरे यांनी माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम त्यांना उमेदवारी देण्याची विनंती केली आहे.

सातारा आणि सांगली मतदारसंघांमध्ये जवळपास 853 इतके मतदार आहेत. त्यापैकी सातारा जिल्ह्यातील 438 पैकी भाजपाकडे 222 सदस्य आहेत. तर सांगलीत भाजपचे अंदाजे 95 सदस्य आहेत. तुलनेत सांगली जिल्ह्यातील भाजपचे सदस्य कमी असल्याने सातारा जिल्ह्याचा हक्क असल्याचा कार्यकर्त्यांचा दावा आहे. त्यामुळे भाजपातून कोणाला उमेदवारी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

MLC Election   (1).jpg
NCP Merger: राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चेला अखेर फुलस्टॉप! शशिकांत शिंदेंनी स्पष्ट सांगितलं; म्हणाले, शरद पवारांच्या नेतृत्वातच...

निवडणूक जाहीर झाल्यानंतर माजी सभापती सुनील काटकर आणि माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांची नावे समोर येत आहेत. त्यांना उमेदवारी मिळावी यासाठी खासदार उदयनराजे छत्रपती आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी विशेष प्रयत्न सुरू ठेवले आहेत.

दरम्यान, दोघांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत विधान परिषदेच्या उमेदवारी बाबत चर्चा केली आहे. फडणवीस सकारात्मक असल्याचे दोन्ही गटाकडून दावा केला जात आहे.

MLC Election   (1).jpg
Eknath Shinde Vs BJP : एकनाथ शिंदेंच्या विरोधात रणनीती, 'स्थानिक'साठी ठाणे -पालघर मतदारसंघावर भाजपचा दावा

सांगली जिल्ह्यातूनही अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. यामध्ये समित कदम, सम्राट महाडिक, पृथ्वीराज देशमुख हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. याशिवाय शेखर इनादार आणि मकरंद देशपांडे यांचीही नावे चर्चेत आहेत. मागील निवडणुकीत हा मतदारसंघ काँग्रेसकडे गेला. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यापुढेही उमेदवारी मिळवण्याचे आव्हान आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com