Shivsena Operation Tiger : निवडणुकीआधीच शिंदेंच्या शिवसेनेनं रणशिंग फुंकलं! कोल्हापूर लोकसभेसाठी उमेदवार फिक्स? राजकीय स्फोटाचे संकेत

uday samant sanjay mandalik lok sabha candidate : राज्यातील प्रमुख पक्ष असलेल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असून दोनाचे चार पक्ष तयार झाले आहेत. आता पुन्हा एकदा या दोन्ही पक्षात मोठी फूट पडणार असा दावा शिंदेंच्या प्रमुख शिलेदाराकडून केला जात आहे.
Eknath Shinde
Eknath Shinde Sarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी तयारीला सुरुवात केली आहे.

  2. उदय सामंत यांनी कोल्हापुरात बैठक घेऊन संजय मंडलिक यांना संभाव्य उमेदवार म्हणून संकेत दिले.

  3. शिवसैनिकांना 1.5 लाख मतांनी विजय मिळवण्याचे आवाहन करत ‘ऑपरेशन टायगर’चा सूचक इशारा दिला.

kolhapur politics : राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीने वेगळी चूल मांडली आहे. हे दोन्ही पक्ष आता राज्यातील महायुतीच्या सत्तेत सहभागी आहेत. तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अद्याप सावरलेला नाही. दरम्यान लोकसभा, विधानसभेनंतर नुकताच झालेल्या स्थानिक स्वराज्यच्या निवडणुकीतही जनतेनं महायुतीलाच भरभरून प्रेम दिलं असून काँग्रेससह ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश आलेले नाही.

अशातच आता राज्यात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेते तथा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी संदर्भात सूचक विधान केला आहे. त्यांनी ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी गाजावाजा करत नाही तर अपसुकच होईल असे म्हटलं आहे. यामुळे राज्यात पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेसह शरद पवारांच्या राष्ट्रवादीत राजकीय स्फोट होईल असा शक्यता व्यक्त केली जातेय. तसेच सामंत यांनी यावेळी कोल्हापुरच्या लोकसभेच्या जागेबाबत भाष्य करताना उमेदवारही घोषित केला आहे.

राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झाले आणि राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता खालसा झाली. पण आता या गोष्टीला तीन वर्ष होत असून अद्याप जनता या बंडाला विसरलेली नाही. याचाच संदर्भ देत उदय सामंत यांनी राज्यात पुन्हा एकदा राजकीय स्फोटाचे संकेत दिले आहेत. त्यांनी, पन्नास जणांनी निर्णय घेतल्यानंतरच एकनाथ शिंदे यांनी उठाव केला आणि त्यानंतर आत्तापर्यंत शिवसेना भक्कम झाली आहे. शिवसेनेनं केलेल्या ऑपरेशन टायगरमधून अनेक बडे नेते शिवसेनेशी जोडले गेले आहेत, असे म्हटले आहे.

Eknath Shinde
Operation Tiger : ऑपरेशन टायगर फसले! ठाकरेंच्या खासदाराने केला 'त्या' भेटीचा खुलासा!

दरम्यान पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि शरद पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आमदार खासदार फुटणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह शिंदेंच्या शिवसेनेतून दावे केले जात आहेत. संजय राऊत यांनी नुकताच सत्ताधारी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून २५-२५ आमदार बाहेर पडतील अस दावा केला होता. हाच धागा धरत उदय सामंत यांनी आता ऑपरेशन टायगर आणि ऑपरेशन तुतारी गाजावाजा करत नाही तर अपसुकच होईल असे संकेत दिले आहेत.

याचवेळी सामंत यांनी, सतत एकनाथ शिंदे यांच्यावर तुटून पडणारे भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक यांचाही समाचार घेतला. नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करू नये, त्यांनी टीका करताना तोंड सांभाळून बोलावं. अन्यथा आमच्याकडेही पदाधिकारी असून ते त्यांचा समाचार घेतील, असा इशारा दिला आहे.

याचवेळी सामंत यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील लोकसभेबाबत भाष्य केलं आहे. अद्याप लोकसभेच्या निवडणुकीला तीन एक वर्षे बाकी असतानाच त्यांनी प्रचाराचा नारळ फोडला आहे. तर कोल्हापुरातील आपलं ठरलंय आणि आमचं ठरलंय याची व्याख्या अद्याप आपल्याला कळाली नाही. एकीकडे आपलं ठरलं म्हणायचं आणि पक्षाला गाडायचं हेच कदाचित इथे लोकांना ठरवले का असा प्रश्न त्यांनी केला. तर आता हे चालणार नसून कोल्हापूर जिल्हा पुन्हा एकदा शिवसेनेचा बालेकिल्ला करायचा आहे.

याआधी निवडून आलेले संजय मंडलिक यांचा पराभव का झाला? कशामुळे झाला? याची पुन्हा चर्चा करायची नाही, त्यात आता जाणारही नाही. मात्र पुढील निवडणुकीत पक्षाची बांधणी चांगली व्हायला पाहिजे. तसे झाले तरच मंडलिक यांचा दीड लाखांनी विजयी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर हा विश्वास व्यक्त करताना आपल्याला आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लढायच्या असून त्या महायुती म्हणूनच लढायच्या असल्याचेही ते म्हणाले. तर एकाआर्थी संजय मंडलिकच शिवसेनेचे उमेदवार असतील असेही नमूद केले आहे

Eknath Shinde
Operation Tiger : ऑपरेशन टायगर? उद्धव ठाकरेंच्या बैठकीला एक खासदार गैरहजर, फोटो आले समोर...

FAQs :

1. उदय सामंत यांनी कोणत्या संदर्भात बैठक घेतली?
कोल्हापुरात आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी बैठक घेतली.

2. संजय मंडलिक यांच्याबाबत काय संकेत दिले गेले?
ते भविष्यात लोकसभेचे उमेदवार असू शकतात असे संकेत देण्यात आले.

3. ‘ऑपरेशन टायगर’ म्हणजे काय?
शिवसेनेच्या संभाव्य राजकीय रणनीतीचा सूचक इशारा मानला जात आहे.

4. शिवसैनिकांना काय आवाहन करण्यात आले?
भावी उमेदवाराला दीड लाख मतांनी निवडून आणण्याचे आवाहन करण्यात आले.

5. ही तयारी का महत्त्वाची आहे?
निवडणुकीला वेळ असला तरी आधीच तयारी सुरू केल्याने पक्ष संघटना मजबूत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com