Solapur Bazar Samiti : माने-हसापुरेंचा सोसायटी गड अभेद्य?, ‘ग्रामपंचायत’मध्ये धक्कादायक निकालाची शक्यता; सुभाषबापूंची मनीषा पूर्ण होणार?

Solapur Bazar Samiti Election Vishleshan : भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी चुरशीने 96.24 टक्के मतदान झाले.
Solapur Bazar Samiti Election
Solapur Bazar Samiti ElectionSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 27 April : भाजपचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख, माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी चुरशीने 96.24 टक्के मतदान झाले. सर्वाधिक चुरस ही सुभाष देशमुखांचे चिरंजीव मनीष हे निवडणूक लढवत असलेल्या ग्रामपंचायत मतदारसंघात दिसून आली. कल्याणशेट्टी, माजी आमदार दिलीप माने आणि सुरेश हसापुरे पॅनेलचा सोसायटी मतदारसंघ हा गड अभेद्य राहण्याची शक्यता असून ग्रामपंचायत मतदारसंघातून धक्कादायक निकालाची शक्यता वर्तविली जात आहे. कारण याच मतदारसंघात क्राँस वाेटिंगची चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे.

सोलापर कृषी उत्पन्न समितीच्या निवडणुकीत (Solapur Bazar Samiti Election) भाजपचे नेते एकमेकांच्या समोर उभे ठाकले होते. भाजपचे जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने, सुरेश हसापुरे यांच्या मदतीने पॅनेल उभे केले होते. त्यांना सुभाष देशमुख, विजयकुमार देशमुख, बळीराम साठे, सिद्धराम म्हेत्रे यांनी एकत्र येऊन आव्हान दिले होते.

माजी मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी चिरंजीव मनीष देशमुख यांना ग्रामपंचायत मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते, त्यामुळे देशमुखांनी प्रथमच तन-मन-धनाने हे निवडणूक लढविल्याचे दिसून आले. सोसायटी मतदारसंघ हा दिलीप माने आणि सुरेश हसापुरे यांचा अभेद्य गड मानला जातो. त्यांची हक्काची मते या मतदारसंघात आहेत. आजच्या मतदानातूनही तो दिसून आला. मात्र, काही ठिकाणी अंडरकरंटची शक्यता नाकारता येत नाही. आगामी पाच वर्षांची गणिते पाहता एकेमकांच्या मार्गातीत अडथळेही दूर करण्याचा प्रयत्नही झालेला असू शकतो. मात्र, ते मतमोजणीनंतर दिसून येणार आहे.

Solapur Bazar Samiti Election
Solapur Bazar Samiti : देशमुख-कल्याणशेट्टींची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या सोलापूर बाजार समितीसाठी 96.24 टक्के मतदान; उद्या दुपारी एकपर्यंत निकाल हाती घेणार

ग्रामपंचात मतदासंघात दोन्ही पॅनेलला संधी दिसून आली. याच मतदारसंघातू मनीष देशमुख यांच्या निवडणुकीच्या राजकीय इनिंगचा श्रीगणेशा होणार असल्याने सुभाष देशमुखांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात क्राँस वोटिंगची चर्चा आहे. उत्तर सोलापूर बळीराम साठे, जितेंद्र साठे यांची नान्नज केंद्रावर दिवसभर ठिय्या मांडला होता. शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख दीपक गायकवाड हे गणेश वानकर यांच्यासाठी दिवसभर उत्तरमध्ये थांबून होते. प्रचाराच्या अखेरच्या दिवशी या मतदारसंघातून अनेक उमेदवार स्वतःसाठी मत मागितले आहे, त्यामुळे ग्रामपंचायत मतदारसंघातून धक्कादायक निकालाची शक्यता नाकारता येत नाही.

व्यापारी आणि हमाल तोलार मतदारसंघात माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख हे वर्चस्व राखतील, अशी शक्यता वर्तविली जात आहे, त्यामुळे बाजार समितीच्या निवडणुकीत माने-हसापुरेंचा सोसायटी मतदारसंघ अभेद्य राहण्याची शक्यता असून ग्रामपंचायत मतदारसंघात मात्र धक्कादायक निकाल लागू शकतो.

Solapur Bazar Samiti Election
Dr. Shirish Valsangkar : डॉ. वळसंगकर प्रकरणात महत्वपूर्ण घडामोड आली पुढे; डॉक्टरांची म्युच्युअल फंडात 160 कोटींची गुंतवणूक;कोणाला मिळणार परतावा?

सुभाष देशमुखांना धक्का

उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरीचे माजी सरपंच आणि विद्यमान उपसरपंच श्रीमंत बंडगर यांनी बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकला. बंडगर यांनी टाकलेला बहिष्कार हा माजी सहकार मंत्री सुभाष देशुख यांना धक्का मानला जात आहे. कारण देशमुख हे सहकार मंत्री असताना बंडगर यांची सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर तज्ज्ञ संचालक म्हणून नियक्ती करण्यात आली होती. तसेच, त्यांनी भाजपचे जिल्हा सरचिटणीस म्हणूनही काम पाहिले आहे, त्यामुळे बंडगरांनी मतदानावर टाकलेला बहिष्कार हा चर्चेचा विषय ठरला आहे. बहिष्करामागील कारण मात्र समजू शकलेले नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com