Gokul Dudh Sangh : शौमिका महाडिकांनी वार्षिक सभेपूर्वी मांडली भूमिका; ‘गोकुळचे अध्यक्ष माझ्या माहेरचे, माझ्या भावाप्रमाणे; पण...’

Shoumika Mahadik Statement : आमच्या विरोधकांप्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावर हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही. ‘गोकुळ’ची उद्याची सभा शांततेत पार पाडण्यासाठी आमचं चेअरमनला सहकार्य असेल.
Shoumika Mahadik
Shoumika Mahadik Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur, 08 September : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी दूध संघाची (गोकुळ) वार्षिक सर्वसाधारण सभा उद्या (ता. 09 सप्टेंबर) होत आहे. गेली चार वर्षांप्रमाणेच याही वर्षी ‘गोकुळ’च्या वार्षिक सभेत महाडिक गट विरोधी भूमिकेत राहील, अशी परिस्थिती होती. मात्र, गोकुळच्या अध्यक्षपदी महायुतीमधील राष्ट्रवादीचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नवीद मुश्रीफ यांची निवड झाल्याने समीकरणे बदलली आहेत. त्याच अनुषंगाने शौमिका महाडिक यांनी ‘नवीन चेअरमन हे कागलचे आहेत, माझ्या माहेरचे आहेत, माझ्या भावाप्रमाणे आहेत, त्यामुळे गोकुळच्या चेअरमनला आमचे नेहमीच सहकार्य असेल,’ अशी भूमिका मांडली आहे.

गोकुळ दूध संघाच्या (Gokul Dudh Sangh) उद्या होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर महाडिक गटाच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्या म्हणाल्या, गेली चार वर्षे मी विरोधी गटाची संचालिका म्हणून काम केलं आहे. पाच वर्षे मला विरोधी संचालिका म्हणूनच काम करावं लागेल, असं वाटलं होतं. पण, राजकारणात एकसारखी परिस्थिती राहत नाही

आमच्या विरोधकांप्रमाणे आम्हाला दोन्ही दगडावर हात ठेवून राजकीय फायदा घेता येत नाही. ‘गोकुळ’ची उद्याची सभा शांततेत पार पाडण्यासाठी आमचं चेअरमनला सहकार्य असेल. आमचा आक्षेप 2023- 24 या आर्थिक वर्षात झालेल्या व्यवहारावर आहे. मागच्या कारभाराचे खापर आम्ही नवीन चेअरमनवर फोडणार नाही, असा शब्दही शौमिका महाडिक (Shoumika Mahadik ) यांनी दिला.

शौमिका महाडिक म्हणाल्या, नवीन चेअरमन हे कागलचे आहेत. माझ्या माहेरचे आहेत. माझ्या भावाप्रमाणे आहेत. ‘गोकुळ’च्या चेअरमनला आमचं नेहमीच सहकार्य असेल. मात्र, आमच्या शंकांचं निरसन झालेलं नाही, त्यामुळे उद्याच्या सभेतही मी व्यासपीठावर बसणार नाही. उद्याच्या सभेत गोकुळ संचालकवाढीचा विषय चर्चेला येणार आहे. या संचालकवाढीला आमचा विरोध आहे. संचालकांची संख्या वाढवून संचालकांवर होणाऱ्या खर्चात आणखी भर घालू नये. मी व्यासपीठावर जाण्याबाबत वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली, कार्यकर्त्यांशी बोलले आहे.

Shoumika Mahadik
Vice President Election : उपराष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीतील ‘क्रॉस व्होटिंग’च्या चर्चेवर श्रीकांत शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले ‘NDAच्या नंबरपेक्षा....’

गोकुळमध्ये महायुतीची सत्ता आहे, असं म्हणत असाल तर या वर्षीच्या गोकुळच्या अहवालात महायुतीच्या एकाही नेत्याचा फोटो छापलेला नाही. ‘गोकुळ’च्या सभेबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्याबाबत आजपर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही. गोकुळच्या कारभाराला माझी मूकसंमती आहे, असा समज होईल, त्यामुळे मी उद्याच्या सभेला स्टेजवर बसणार नाही, असेही त्या म्हणाल्या.

Shoumika Mahadik
Shahajibapu Patil : शहाजीबापूंच्या फॉर्म्युल्याने महायुतीत पडणार वादाची ठिणगी; ‘भाजपला पदवीधर, तर शिवसेनेला शिक्षक’ मग राष्ट्रवादीचे काय?

महाडिक म्हणाल्या, गोकुळच्या संचालकवाढीस माझा विरोध आहे. पण, प्रत्येक तालुक्यात एक संचालक आणि जिथं वाढीव सभासद आहे, तिथंच संचालक वाढवावेत. विरोधकांनी यापूर्वी संचालकावर 3 लाख खर्च होत असताना टीका केली होती, पण, आता त्यांच्या काळात 13 लाख खर्च केला जातोय. ‘गोकुळ’मधील एका रेडिओ जाहिरातीत 56 हजार बिल असताना, त्यांचा खर्च 2 लाख दाखवला जातो. आमचा आक्षेप ‘गोकुळ’च्या 2023-24 मधील कारभारावर आहे, त्याचे उत्तरे मिळाली पाहिजेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com