Smriti Mandhana : स्मृती मानधनाच्या लग्नात मोठं विघ्न; वडिलांना हृदयविकाराचा झटका

Smriti Mandhana Palash Muchhal Wedding : स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांचे सांगलीमध्ये लग्नाची तयारी सुरू असतानाच लग्न रद्द करण्यात आले आहे.
Smriti Mandhana
Smriti Mandhanasarkarnama
Published on
Updated on
Summary
  1. स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांचा 23 तारखेला होणारा भव्य विवाहसोहळा रद्द करण्यात आला.

  2. स्मृतीच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे कुटुंबाने तातडीने निर्णय घेतला.

  3. लग्नाची संपूर्ण तयारी, मंडप, सजावट आणि घोडी तयार असतानाच हा मोठा बदल घडला.

Sangli News : भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू आणि सांगलीची लेक स्मृती मानधना हिचा विवाहसोहळा रविवारी (ता.२३) मोठ्या थाटात संपन्न होणार होता. तिचे लग्न म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांच्याशी होणार होते. लग्नाची पूर्ण तयारी झाली होती. मोठे मंडप उभारण्यात आले होते. घोडी ही आणली होती. पण तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न रद्द करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.

स्मृती मानधना हिने ज्या मैदानावर भारताची मान उंचावली तेथेच पलाश मुच्छल यांनी तिला लग्नाची मागणी घातली होती. यानंतर गेल्या चार दिवसापासून त्यांच्या लग्नातील विविध कार्यक्रम सुरू होते. तर तिच्यासह घरातील सर्वच मंडळी सांगलीतील मुळगावी आले होते. येथील एका फार्म हाऊसमध्ये काल रात्री मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न समारंभादरम्यान स्मृती मानधनाच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली, ती खालावत चालल्याने तेथे प्रचंड गोंधळ उडाला. यानंतर तत्काळ त्यांना रुग्णवाहिका बोलवून तातडीने उपचारासाठी येथील खासगी खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सध्या हे लग्न रद्द झाल्याची माहिती मिळत असून विवाहस्थळी तणाव दिसत आहे.

Smriti Mandhana
Sangli Politics : सांगलीतील 'देशमुख बंधुंचं' पहिल्यांदाच फाटलं : संस्थांसाठी सेटलमेंट की खरंच कडाक्याची भांडणं?

यानंतर येथे विविह स्थळी सुरू असणाऱ्या सर्व तयाऱ्या थांबवण्यात आल्या असून लग्नासाठी उभारलेला मंडप उतरवला जात आहे. वरातीसाठी आणलेल्या घोडी ही परत पाठवण्यात आल्या आहेत. तर जोपर्यंत वडीलांची प्रकृती स्थिर होत नाही. वडील घरी येत नाहीत तोपर्यंत हे लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय स्मृती मानधनाने घेतल्याचे तिच्या जवळ्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.

...आता विवाहबद्ध

स्मृती मानधना आणि म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल गेल्या काही दिवसापासून चांगलेच चर्चेत आले होते. नुकताच भारतीय महिला क्रिकेट टीमने साउथ अफ्रिकेला नमवत वर्ल्ड कप जिंकला होता. यावेळी स्मृती मानधनाच्या अंगावर भारतीय ध्वज ठेवल्यानंतरच म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाच्या प्रेमाची चर्चा सुरू झाली होती.

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल हे एकमेकांना 2019 पासून डेट करत असून दोघांनीही आपले रिलेशनशिप खाजगी ठेवले होते. ज्यामुळे याची कोणालाच कल्पना नव्हती. दरम्यान 2024 मध्ये त्यांच्या नात्याची अधिकृत माहिती समोर आली आणि पलाशने नवी मुंबईतील डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये सर्वांसमोर गुडघ्यावर बसून स्मृतीला प्रपोज केलं होते. त्याचे व्हिडिओ चांगलेच व्हायरल झाले होते. तर आता दोघेही लग्नाच्या बंधनात आता अडकणार होते.

Smriti Mandhana
Sangli News : सांगलीत IAS अधिकाऱ्याने दाखवली 'पॉवर' : भाजप आमदाराचे अतिक्रमण डोळ्यादेखत उद्ध्वस्त

FAQs :

1. स्मृती मानधनाचे लग्न का रद्द झाले?
स्मृती मानधनाच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.

2. लग्नाची तारीख कोणती होती?
विवाहसोहळा 23 तारखेला होणार होता.

3. लग्न कोणाशी होणार होते?
प्रसिद्ध म्युझिक डायरेक्टर पलाश मुच्छल यांच्याशी.

4. तयारी झालेली होती का?
होय, भव्य मंडप, सजावट आणि घोडीपर्यंत सर्व व्यवस्था पूर्ण झाल्या होत्या.

5. पुढील लग्नाची तारीख जाहीर झाली आहे का?
नाही, कुटुंबाच्या परिस्थितीनुसार नंतर निर्णय घेतला जाईल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com