Vikas Lawande Ink Throwing Case : नीतेश राणे म्हणतात हे तर अपेक्षितच : विकास लवांडेंनी आपलं थोबाड बंद ठेवावं अन्‌ औकातीत राहावं...

Nitesh Rane Statement : विकास लवांडे यांच्यावर झालेल्या शाईफेकीनंतर नीतेश राणे यांच्या प्रतिक्रियेमुळे राजकीय वाद अधिकच चिघळला आहे. या घटनेमुळे राज्यातील राजकारण तापले आहे.
Nitesh Rane
Nitesh Rane Sarkarnama
Published on
Updated on

Sindhudurg, 09 May : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर हवेली तालुक्यातील आळंदी म्हातोबाची येथे शाईफेक करण्यात आली. वारकरी संप्रदायातील संग्राम भंडारे आणि त्यांच्यासेाबत असलेल्या १० ते १५ गोरक्षकांनी आपल्यावर हल्ला केला, ते मला जीवे मारण्याची धमकी देत होते, असा आरोपही लवांडे यांनी केला आहे. त्यावर मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नीतेश राणे यांनी प्रतिक्रिया दिली असून ‘ये तो सिर्फ झाँकी है, पुरा पिक्चर अभी बाकी है,’ असे राहून आपल्या औकातीत राहावं, असा इशारा दिला आहे.

मंत्री नीतेश राणे (Nitesh Rane) म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आमच्या साधू संतांबद्दल, हिंदू धर्माच्या महाराजांबद्दल जे काही अपशब्द वापरले, त्या दृष्टीकोनातून हिंदू समाजात हा राग आणि चीड निर्माण होणं साहजिक आहे.

विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी आपलं थोबाड थोडं बंद ठेवलं असतं. आमच्या हिंदूराष्ट्रात राहूनच आमच्या साधू संतांबद्दल अशी खालच्या पातळीवरील टीका करण्याची कोणाची हिम्मत होत असेल तर असे शाईफेकीचे कार्यक्रम अपेक्षितच आहेत. शेवटी आम्ही सर्व हिंदुत्ववादी विचाराचे लोकं आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेना, भाजप हे नंतर, मुळात आम्ही हिंदू आहोत, असा दावाही राणे यांनी केला.

आमचा हिंदूधर्म वाढविण्यासाठी जे धर्मगुरू काम करत आहेत, त्यांच्याबद्दल कोणी अपशब्द वापरत असेल तर ‘ये तो सिर्फ झाँकी है, पुरा पिक्चर अभी बाकी है.’ एवढं लक्षात ठेवावं आणि आपल्या औकातीत राहावं, असा इशाराही नीतेश राणे यांनी केला आहे.

Nitesh Rane
Congress News : काँग्रेसचेही भाजपच्या पावलावर पाऊल; सोलापुरात दोन जिल्हाध्यक्ष अन्‌ एक शहराध्यक्ष नेमणार

ते म्हणाले, हिंदू राष्ट्र भक्कम करण्यासाठी साधू संत जे मार्गदर्शन करतात, ते मार्गदर्शन सकारात्मक घेऊन आपलं राष्ट्र आणखी भक्कम कसं होईल, त्या दृष्टीकोनातून सर्वांनी विचार करावा.

Nitesh Rane
Nashik Ring Road : नाशिकच्या शेतकऱ्यांना धक्का ; 66 किमी रिंगरोडसाठी भूसंपादन सुरूच राहणार, उच्च न्यायालयाचा निर्णय

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने गावागावांत, वस्तीनिहाय, जिल्ह्यानिहाय हिंदू संमेलनं आयोजित करण्यात आली आहेत. त्या संमेलनात हिंदू समाजाशी संवाद साधण्यासाठी मला बोलाविण्यात आले आहे. हिंदू समाजाला एकत्र आणणं आणि संघाच्या कार्यक्रमातून राष्ट्रनिर्माण आणि व्यक्ती निर्माणाचा जो काही प्रवास आहे, त्याबाबत जास्तीत जास्त माहिती देणं, असा या कार्यक्रमाचा उद्देश आहे, त्यासाठी मी जात आहे, असेही राणे यांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com