Congress News : काँग्रेसचेही भाजपच्या पावलावर पाऊल; सोलापुरात दोन जिल्हाध्यक्ष अन्‌ एक शहराध्यक्ष नेमणार

District Presidents Election : काँग्रेसने सोलापुरात ग्रामीण, माढा आणि शहर अशा स्वतंत्र अध्यक्ष नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी ही रणनीती आखण्यात आली आहे.
Congress
Congress Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 09 May (विठ्ठल सुतार) : काँग्रेसने संघटनात्मक पातळीवर भाकरी फिरविण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय जनता पक्षाप्रमाणे दोन जिल्हाध्यक्ष आणि एक शहराध्यक्ष नेमण्याचा निर्णय काँग्रेस पक्षाने घेतला आहे. त्या माध्यमातून पक्ष संघटना बळकट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सोलापूर ग्रामीण, माढा आणि सोलापूर शहर अशी अध्यक्षांची निवड होणार आहे. येत्या दोन दिवसांत या निवडीची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, सोलापूर (Solapur) ग्रामीण वगळता माढा आणि सोलापूर शहरासाठी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. केरळ, आसाम आणि पश्चिम बंगालच्या निवडणुका संपल्याने अध्यक्ष निवडीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. भाजपने सोलापूर शहराध्यक्ष, सोलापूर आणि माढा लोकसभेसाठी स्वतंत्र जिल्हाध्यक्ष नेमले आहेत, तसेच शहराध्यक्ष स्वतंत्र अध्यक्ष नेमला आहे, तेच धोरण काँग्रेसनेही हाती घेतल्याचे दिसते.

सोलापूर काँग्रेस (Congress) शहरासाठी विद्यमान नगरसेवक चेतन नरोटे, माजी महापौर संजय हेमगड्डी आणि माजी सभापती विजय हत्तुरे यांची नावे चर्चेत आहेत. माढ्यासाठी अशोक चोपडे (करमाळा), पृथ्वीराज साठे (माढा) व राजकुमार पवार (सांगोला) यांची नावे पुढे आली आहेत.

सोलापूर ग्रामीणसाठी विद्यमान अध्यक्ष सातलिंग शटगार (अक्कलकोट), अर्जुन पाटील (मंगळवेढा) व रमेश हसापुरे (दक्षिण सोलापूर) यांची नावे चर्चेत आहेत. यातील अंतिम तीन नावांची घोषणा दिल्लीतून होणार आहे. निरीक्षक देबाशिष पटनाईक यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अध्यक्षांची घोषणा होणार असल्याचे स्पष्ट केले होते.

स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा निवडणुकांतील पराभवानंतर काँग्रेसने संघटना बळकट करण्यासाठी जुने चेहरे बदलून नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्या संकल्पनेतील ‘सृजन अभियान’ थेट तालुका व जिल्हास्तरावर राबविण्यात आले.

Congress
MP Politics : "300 कोटी मिळाले तरच..!" आमदाराच्या वक्तव्याने काँग्रेस अडचणीत, भाजपचंही टेन्शन वाढलं; दोन्ही पक्षातील राजकीय वातावरण तापलं

सृजन अभियानांतर्गत इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. पक्षपातळीवरून संघटनेत बदलाचे संकेत देण्यात आल्यानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला आहे.

विद्यमान शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या कार्यपद्धतीबाबत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केल्या होत्या. तसेच, विधानसभेचे तिकीट आणि नगरसेवकपदाची संधी मिळाल्याने त्यांच्या जागी नवीन चेहरा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

माढा मतदारसंघात पहिल्यांदाच अध्यक्षपद निर्माण झाल्याने निष्ठावान कार्यकर्त्यांना संधी दिली जाणार आहे. सोलापूर ग्रामीणमध्ये मात्र सातलिंग शटगार यांनाच संधी मिळणार की नवीन चेहरा येणार, याकडे लक्ष लागले आहे.

Congress
Manoj Jarange: आता एक घाव दोन तुकडे! मनोज जरांगेंचा इशारा; पुन्हा मोठं आंदोलन, लवकरच तारीख करणार जाहीर

अंतर्गत वादाची पक्षश्रेष्ठींकडून दखल

शहर व ग्रामीण काँग्रेसमधील अंतर्गत वादाची दखल पक्षश्रेष्ठींनी घेतली आहे. अध्यक्ष आणि पदाधिकारी निवडीनंतर पक्षात राहून पक्षाशी दगाफटका करणाऱ्यांवर कारवाईचे संकेत देण्यात आले आहेत. अनेक ठिकाणी नवीन व एकनिष्ठ पदाधिकाऱ्यांना संधी मिळणार असल्याचे वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com