Solapur DCC Bank: 'मला काय सोलापूर डीसीसी बँकेचं चेअरमन व्हायचं नाही...': भाजप आमदार राजेंद्र राऊतांनी निवडणुकीपूर्वीच बाॅम्ब फोडला

Solapur Politics: आमदार राजेंद्र राऊत यांनी आपण डीसीसी बँकेचे चेअरमन होणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात डीसीसी बँकेच्या चेअरमनपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.
Rajendra Raut Narayan Aaba Patil
Rajendra Raut Narayan Aaba Patil Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Karmala News : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या हितासाठी आपण सातत्याने प्रयत्न केले असून, बँकेची वसुली शंभर टक्के झाली पाहिजे, ही आपली आजही भूमिका आहे. मात्र, आगामी निवडणुकीत डीसीसी बँकेच्या चेअरमनपदाच्या भानगडीत मला नका टाकू आणि मी चेअरमन होणारही नाही. माझी चेअरमन होण्याची इच्छादेखील नाही, असे स्पष्टीकरण जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदासाठी चर्चेत असलेले आमदार राजेंद्र राऊत यांनी दिले.

आमदार राजेंद्र राऊत यांनी आपण डीसीसी बँकेचे चेअरमन होणार नसल्याचे स्पष्ट केल्यामुळे सोलापूर जिल्ह्यात डीसीसी बँकेच्या चेअरमनपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात आहे.

करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या भेटीनंतर ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, जिल्हा बँकेचे माजी संचालक अरुण कापसे, बार्शीचे माजी नगराध्यक्ष रमेश पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा परिषद सदस्य प्रशांत पाटील, बाजार समितीचे उपसभापती बबन मेहेर यांच्यासह बाजार समिती व खरेदी-विक्री संघाचे आजी-माजी संचालक, नगरसेवक, गटसचिव उपस्थित होते.

सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीबाबत राऊत म्हणाले, ‘‘प्रशासकाच्या काळात बँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली आहे. माझ्या बार्शी तालुक्यातील १३५ पैकी १३० ठराव माझ्या बाजूने आहेत. माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली डीसीसी बँकेची निवडणूक लढवून कामकाज करू.

Rajendra Raut Narayan Aaba Patil
Pune Teacher Election: रामराजेंचे फलटणमधून 'पुणे शिक्षक'च्या निवडणुकीबाबत मोठे संकेत, मंगेश चिवटेंना म्हणाले,'तुम्ही काळजी करू नका...'

एकाच कारखान्याला 300 कोटी कर्ज देणे हा बँकेचा निर्णय चुकीचा आहे, आजही बँकेचे सर्व पैसे वसूल झाले पाहिजेत आणि त्याबाबत कुठलीही तडजोड केली जाणार नाही,असंही आमदार राजेंद्र राऊत यांनी म्हटलं.

मध्यंतरी जिल्हा बँकेच्या संदर्भात सोलापूर येथे झालेल्या बैठकीत आमदार राजेंद्र राऊत आणि माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याची सर्वत्र चर्चा आहे. त्यावर आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, ‘‘माझे कोणाबरोबरही काहीही वाकडे नाही. माझे आणि संजयमामांचे वैचारिक मतभेद काही मुद्द्यावर असतील.

Rajendra Raut Narayan Aaba Patil
Pune MLC Election: पुणे 'शिक्षक आणि पदवीधर'बाबत धक्कादायक अपडेट; 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर, 'आमदारकी'चं स्वप्नं भंगलं

मागील वेळी आम्ही सर्वजण माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी खासदार व्हावे, अशी इच्छा व्यक्त केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही तशीच इच्छा होती. मात्र, त्यावेळी संजयमामा शिंदे यांनी खासदार होण्यास नकार दिला,’’ असे राऊत यांनी सांगितले.

माजी आमदार जयवंतराव जगताप म्हणाले, आमदार राजेंद्र राऊत हे जमिनीवर चालणारे नेतृत्व असून सध्या ते जिल्ह्यातील महत्त्वाच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, मी त्यांच्या पाठीशी आहे.

Rajendra Raut Narayan Aaba Patil
AIMIM News : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी राजधानी दिल्लीतील विरोधकांच्या मोर्चात 'एमआयएम' का नाही? खासदार ओवैसींनी सांगितलं मोठं कारण

'आदिनाथ'साठी पाटलांसोबत

करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला मदत मिळावी; म्हणून आमदार नारायण आबा पाटील सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. त्यांनी माझी देखील भेट घेऊन कारखान्याला मदत मागितली आहे. तुमच्या तालुक्यातील अंतर्गत राजकारण काही असो पण आदिनाथ कारखान्याला मदत करण्यासाठी आम्ही आमदार पाटील यांच्याबरोबर आहोत, असेही आमदार राजेंद्र राऊत यांनी सांगितले. आदिनाथ कारखान्याला मदत मिळावी, म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विनंती केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com