

Pune News : पुणे विभागातील विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली. पदवीधर मतदारसंघासाठी तब्बल 87 उमेदवारांनी,तर शिक्षक मतदारसंघासाठी 67 उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी या दाखल उमेदवारी अर्जांची छाननी पार पडली. यात आता पदवीधर निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी 6 अवैध ठरले तर शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दाखल उमेदवारांपैकी 1 अर्ज बाद झाला आहे.
पुणे विभागातील पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीकडे सध्या राज्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी 9 ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर या 23 ऑ मतदान आणि 27 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. महायुतीत दोन्ही जागांवर उमेदवार निश्चित करण्यावरून अद्याप एकमत झालेलं दिसून येत नाही. त्यामुळे भाजपसह शिवसेनेच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे अर्ज दाखल केला आहे.यामुळे निवडणुकीतील चुरस वाढण्याची शक्यता आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 87 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. भाजपने पदवीधरसाठी स्मिता जाधव यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रताप (भैय्या) माने यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे महायुतीसमोर उमेदवारीवरून निर्माण झालेला पेच कायम आहे. प्रताप माने यांनी 2020 मध्ये ही जागा अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकली होती, असा दावा करत ही जागा राष्ट्रवादीची नैसर्गिक पसंती असल्याचे म्हटले आहे. गेल्या दोन वर्षांपासून आपण निवडणुकीची तयारी करत असल्याने उमेदवारीवर ठाम असल्याचेही त्यांनी स्पष्ट के
तर दुसरीकडे, पदवीधरसाठी महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने हर्षदा देशमुख-जाधव यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे पदवीधर मतदारसंघात बहुरंगी लढतीची शक्यता निर्माण झाली आहे.
शिक्षक मतदारसंघासाठी 67 उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. या मतदारसंघातही महायुतीतील जागावाटपावरून पेच निर्माण झाला आहे. त्यात आता 1 अर्ज अवैध ठरला आहे. भाजपने पुणे शिक्षकसाठी ऐनवेळी कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी दिल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते मंगेश चिवटे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेनेने महायुतीत असतानाही पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लढवण्याचा दावा कायम ठेवला आहे. मंगेश चिवटे यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेनेचे नेते आणि मंत्री उदय सामंत तसेच प्रकाश आबिटकर यांसह खासदार ज्योती वाघमारे याही उपस्थित होत्या. चिवटे यांनी आपल्याला एकनाथ शिंदे यांनीच उमेदवारी अर्ज दाखल करण्यासंदर्भातील सूचना दिल्याचं स्पष्ट केलं होतं.
याशिवाय उद्योगमंत्री उदय सामंत यांचे स्वीय सहाय्यक व शिवसेनेचे सचिन सानप यांनीही अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसने शिक्षक मतदारसंघासाठी जयंत आसगावकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे शिक्षक मतदारसंघातही राजकीय समीकरणे गुंतागुंतीची झाली आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.