Pune Teacher Election: रामराजेंचे फलटणमधून 'पुणे शिक्षक'च्या निवडणुकीबाबत मोठे संकेत, मंगेश चिवटेंना म्हणाले,'तुम्ही काळजी करू नका...'

Ramraje Naik Nimbalkar News: गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीत बंडखोरी झाली आहे. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी पुणे शिक्षकसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
Mangesh Chivate Ramraje Naik Nimbalkar
Mangesh Chivate Ramraje Naik Nimbalkar Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Satara News: पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीत बंडखोरी झाली असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून मंगेश चिवटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात प्रतिष्ठेची करण्यात आलेल्या पुणे शिक्षक मतदार संघाची जागा अखेर महायुतीत भाजपला सुटली आहे. भाजपनं कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांना पुणे शिक्षकच्या निवडणुकीत ताकद पुरवणार असल्याचे संकेत विधानपरिषदेचे माजी सभापती आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकरांनी दिले आहेत.

एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे पुणे शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार मंगेश चिवटे यांच्या प्रचारार्थ फलटण येथे बुधवारी(ता.7 ऑक्टोबर) सभा पार पडली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपण लढतीला तर उतरलेलो आहोत. महायुतीमध्ये राज्यपातळीवर आपलं ऐकलं गेलं नसल्याचं म्हटलं. तसेच महायुतीकडून दिलेला शब्द पाळला नाही,तर अपक्ष लढा असा सल्ला त्यांनी चिवटेंना दिला.

यावेळी रामराजे निंबाळकरांनी फलटणच्या DNA मध्येच अपक्ष आहे,तुम्ही काळजी करू नका असंही म्हटलं. मंगेश चिवटे यांना निवडणुकीत उमेदवारी कायम ठेवण्याबाबतचा महत्त्वपूर्ण सल्ला दिला. रामराजेंनी या सभेत त्यांच्या राजकीय कारकीर्दीतील सुरुवात अर्थात 1995 च्या विधानसभा निवडणुकीवेळचा रंजक किस्साही सांगितला.

ते म्हणाले, 1996 साली मी राजकारणात आलो, तेव्हाही सर्वांनी मला अशाचप्रकारे विधानसभेत अपक्ष म्हणून निवडून पाठवलं होतं. यावेळी संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार मंगेश चिवटे यांच्या उमेदवारीला जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.

Mangesh Chivate Ramraje Naik Nimbalkar
Pune MLC Election: पुणे 'शिक्षक आणि पदवीधर'बाबत धक्कादायक अपडेट; 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणातून बाहेर, 'आमदारकी'चं स्वप्नं भंगलं

संजीवराजे म्हणाले,मंगेश चिवटे यांनी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून केलेली अविरत रुग्णसेवा हीच त्यांची खरी ताकद आहे. सर्वसामान्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी उभं राहण्याचं कामही चिवटेंनी केलं आहे. त्यांची हीच जनसेवेची पार्श्वभूमी शिक्षक मतदारसंघातील उमेदवारीसाठीची प्रमुख ओळख असल्याचं विधानही त्यांनी केलं.

या सभेत संजीवराजेंनी एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत मंगेश चिवटे यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत माघार नाही, तर निवडूनच यायचं असा राजकीय लढाऊ बाणा पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत दाखवण्याचं चिवटेंना सांगितलं.

Mangesh Chivate Ramraje Naik Nimbalkar
Shivraj More: "संकटात सापडलेल्या मुलीच्या मदतीसाठी...." शिवराज मोरेंचं नवनाथ बन यांच्या आरोपांवर स्पष्टीकरण; कायदेशीर कारवाईचाही दिला इशारा

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com