Solapur Loksabha 2024 Result : 'बीडचं पार्सल...' ; मोहिते पाटलांनी सोलापूरमध्ये आपला शब्द खरा करून दाखवला!

Praniti Shinde Vs Ram Satpute News : माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना...
Dhairyasheel Mohite Patil-Ram satpute
Dhairyasheel Mohite Patil-Ram satputeSarkarnama
Published on
Updated on

Solapur Political News : माढा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील यांना डावलणे भाजपला चांगलेच महागात पडले आहे. कारण माढ्याबरोबरच सोलापूरची जागा गमावण्याची नामुष्की भाजपवर आली आहे. सोलापुरातील भाजपच्या पराभवात मोहिते पाटील यांची भूमिका निर्णायक ठरली आहे. माढ्यातून भाजपने उमेदवारी नाकारल्यानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांनी ‘विजयदादांनी सांगितल्यामुळे तुला एका रात्रीत आमदार केलं. तसं तुझं पार्सल एक रात्रीत बीडला पाठविण्याची धमक आमच्यात आहे,’ असा इशारा दिला होता. तो त्यांनी खरा करून दाखवला आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil) हे निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. मात्र, त्यांना डावलून भाजपने माढ्यातून विद्यमान खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना तिकिट दिले. त्यानंतर मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढ्याची निवडणूक लढवली.

खरं तर मोहिते पाटील यांचा भाजपवर राग नव्हता. राग होता तो माढ्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार राम सातपुते यांच्यावर. तो राग धैर्यशील मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रवेशाच्या कार्यक्रमात काढला.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी शेलक्या शब्दांत निंबाळकर आणि सातपुते यांचा समाचार घेतला. आम्हाला पक्षाचा पदाधिकारी नेमण्याचीही मुभा नव्हती, अशी खंत धैर्यशील यांनी मांडली होती. त्याचबरोबर माळशिरसमध्ये मोहिते पाटील यांना डावलण्याचा प्रयत्न आमदार सातपुते यांच्याकडून होत होता. त्याचा राग मोहिते पाटील यांना होता. त्याच कार्यक्रमात धैर्यशील मोहिते पाटील यांनी आमदार राम सातपुते यांना उद्देशून बीडचं पार्सल एका रात्री परत पाठविण्याची धमक आमच्यात आहे, असा इशारा दिला होता. माळशिरसमध्ये डावलण्याचा वचपा मोहिते पाटील यांनी सोलापूरमध्ये आपली यंत्रणा कामाला लावून काढला.

मोहिते पाटील यांचे एकेकाळी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व होते. माढ्याप्रमाणेच सोलापूर लोकसभा मतदारसंघातही मोहिते पाटील यांना मानणारा वर्ग आहे. तो कायम मोहिते पाटील यांच्यावर निष्ठा ठेवून राहणारा आहे. हे मोहिते पाटील यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात दाखवून दिले होते. सोलापूर लोकसभेच्या २००३ मधील पोटनिवडणुकीत प्रतापसिंह मोहिते पाटील हे काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार आनंदराव देवकते यांचा पराभव करून निवडून आले होते. माळशिरसमधील यंत्रणेबरोबरच सोलापूरमधील कार्यकत्यांचेही त्यात मोठे योगदान होते.

Dhairyasheel Mohite Patil-Ram satpute
Solapur Lok Sabha Vishleshan : ‘फ्लाॅवर समझा क्या....फायर हूँ..’; प्रणिती शिंदेंनी निकालातून दाखवले!

आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांचा पराभव करण्याच्या उद्देशाने मोहिते पाटील यांनी आपली ताकद काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी उभी केली. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून प्रणिती शिंदे यांना निवडून आणण्याच्या दृष्टीने मोहिते पाटील यांनी कार्यकर्त्यांना कामाला लावले. तत्पूर्वी शिवरत्नवर ज्येष्ठ नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या लंच डिप्लोमसी झाली. त्यातही कोण काय करायचं आणि कुठे ताकद लावायची हे ठरले होते.

धैर्यशील मोहिते पाटील यांनी राम सातपुते यांचे पार्सल परत पाठविण्याचा दिलेल्या इशाऱ्यानुसार समर्थकांनी काम केल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांना मिळालेल्या मताधिक्क्यावरून दिसून येते. सोलापूरमध्ये फडणवीसांचे निकटतर्वीय मानल्या जाणाऱ्या राम सातपुते यांचा पराभव करत मोहिते पाटील यांनी आपला शब्द करा केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Dhairyasheel Mohite Patil-Ram satpute
Jalna Lok Sabha Election : 'रावसाहेब दानवेंचा अहंकार जनता नक्की उतरवणार'; काँग्रेस उमेदवार काळेंची टीका!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com