Dhairyasheel Mohite Patil : धैर्यशील मोहिते पाटलांनी विजयी आघाडी घेताच ‘शिवरत्न’वर जेसीबीने गुलाल उधळला!

Madha Lok Sabha Election 2024 : माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते पाटील यांनी जेसीबीतून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला.
Akluj celebration
Akluj celebrationSarkarnama

Solapur, 04 June : माढा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांनी १९ व्या फेरीअखेर ८४ हजार ५८३ मतांची विजयी आघाडी घेतली आहे. त्यानंतर अकलूजमध्ये शिवरत्न बंगल्यावर जेसीबीने गुलाल उधळून जल्लोष साजरा करण्यात आला.

माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite Patil ) हे लोकसभेची निवडणूक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र, भाजपने रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनाच पुन्हा तिकिट दिले. त्यामुळे मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली. खरं मोहिते पाटील यांना विश्वासात घेऊन भाजपला निंबाळकरांची उमेदवारी घाेषित करता आली असती. मात्र, माढ्याच्या (Madha) उमेदवारीचा एकतर्फी घेतलेला निर्णय मोहिते पाटील यांना रूचला नसल्याचे पुढील घडामोडीवरून दिसून येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

माढा लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली. पहिल्यांदा टपाली मतांची मोजणी करण्यात आली. त्या टपाली मतांच्या मोजणीपासूनच धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली होती. निंबाळकर हे पहिल्या फेरीपासून शर्यतीत आलेच नाहीत. मात्र, मोहिते पाटील यांनी मताधिक्क्याचा केलेला दावाही खरा ठरला नाही.

दरम्यान, मतमोजणीच्या १९ व्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते पाटील यांना ४ लाख ८४ हजार ५२१ मते पडली आहेत, तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना ३ लाख ९९ हजार ९३८ मते पडली आहेत. म्हणजे १९ व्या फेरीअखेर धैर्यशील मोहिते पाटील हे ८४ हजार ५८३ मतांनी आघाडीवर आहेत.

Akluj celebration
Solapur Lok sabha Result : प्रणिती शिंदेंनी आई-वडिलांच्या पराभवाचा वचपा काढला; सोलापुरात 81 हजार मतांनी विजयी

माढा लोकसभा मतदारसंघातून ८४ हजार ५८३ मतांची विजयी आघाडी घेताच खुद्द धैर्यशील मोहिते पाटील यांनीही माध्यमांशी संवाद साधला. तसेच अकलूजमध्येही जल्लोष करण्यात आला. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या पत्नी नंदिनीदेवी मोहिते पाटील यांनी जेसीबीतून गुलाल उधळत आनंदोत्सव साजरा केला. अकलूज शहरातही ठिकठिकाणी मोहिते पाटील यांच्या विजयाचा जल्लेाष साजरा करण्यात आला.

Akluj celebration
Ram Satpute Banner : प्रणिती शिंदेंनी आघाडी घेतली अन्‌ राम सातपुतेंच्या विजयाचा बॅनर काढला!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com