Solapur Bazar Samiti : विधानसभेआधी उडणार बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा...

Mahayuti Politics : राजकीय कुरघोड्यातून सोलापूर बाजार समितीच्या प्रशासक नेमण्याऐवजी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तसा अंदाजित कार्यक्रम निवडणूक प्राधिकरणाला पाठविला जाणार असल्याची माहिती आहे.
Solapur Bazar Samiti
Solapur Bazar SamitiSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 24 July : सध्या सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या अनुंषगाने चर्चा होत असताना सोलापूरमध्ये कार्यकर्त्यांना प्रथम सत्तेवर जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर सत्ताधाऱ्यांकडून अशासकीय प्रशासक मंडळ आणण्याचा प्रयत्न होत असताना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून मात्र निवडणुकीची पूर्वतयारी जोरदारपणे सुरू आहे.

बाजार समितीची मतदारयादी आज (ता. 24 जुलै) अंतिम होणार आहे. त्यानंतर उपनिबंधक कार्यालयाकडून निवडणूक प्राधिकरणाला निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम पाठविला जाणार आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या अगोदर बाजार समितीच्या निवडणुकीचा प्रचाराचा धुराळा उडणार आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीला (Solapur Bazar Samiti) यापूर्वी दोन वेळा मुदतवाढ मिळाली आहे. बाजार समितीचे तत्कालीन सभापती तथा भाजप आमदार विजयकुमार देशमुख (vijaykumar Deshmukh) यांनी तिसऱ्यांदा मुदतवाढ मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो अयशस्वी ठरल्यानंतर त्यांनी आपले चिरंजीव डॉ. किरण देशमुख यांच्यासह मर्जीतील कार्यकर्त्यांच्या नावाची शिफारस केली होती.

तत्पूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अमोल शिंदे आणि मनीष काळजे यांच्या नियुक्तीचा आदेश राज्याच्या अव्वर सचिवांच्या सहीने काढला होता. तो आदेश पणन विभागाकडे पाठविण्यात आला आहे. राज्याच्या पणन विभागाकडून सोलापूर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही, त्यामुळे शिवसेनेच्या दोन्ही अशासकीय सदस्य निवडी अद्याप प्रलंबित असल्याची माहिती आहे.

विशेष म्हणजे भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांनी पाठविलेल्या तीन सदस्यांच्या शिफारशीही अद्याप प्रलंबित आहेत. महायुतीमधील सर्वच पक्षाच्या स्थानिक नेत्यांना बाजार समितीवर संधी मिळण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे राजकीय कुरघोडीतून सोलापूर जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीवर प्रशासक येण्याऐवजी निवडणूक लागण्याची शक्यता अधिक आहे.

Solapur Bazar Samiti
Old Pension scheme : खासदार प्रणिती शिंदेंच्या पहिल्याच प्रश्नाला धक्का; 'जुन्या पेन्शन'बाबत केंद्राचा मोठा निर्णय

सोलापूर बाजार समितीचे सोलापूर शहर, उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर असे कार्यक्षेत्र आहे. बाजार समितीची मतदार यादी अंतिम करण्याची कार्यवाही सध्या सुरू आहे. दोन्ही तालुक्यातील विविध कार्यकारी सोसायट्या, ग्रामपंचायतींचे मतदार, व्यापारी, हमाल तोलार यांचा मतदार यादीत समावेश असणार आहे.

बाजार समितीसाठी एकूण पाच हजार 431 मतदार असण्याची शक्यता आहे. त्यात विविध कार्यकारी सहकारी सोसायट्याचे एक हजार 895, ग्रामपंचायतींचे एक हजार 176, व्यापारी मतदारसंघातील एक हजार 276 तर हमाल तोलारमधील एक हजार 84 मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे अंतिम मतदार यादीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

Solapur Bazar Samiti
Union Budget 2024 : मोदींचे चंद्राबाबू अन्‌ नीतिशबाबूंना पाठिंब्याचे ‘रिटर्न गिफ्ट’; आंध्रासाठी 15 हजार कोटींचे विशेष पॅकेज!

असे निवडणार बाजार समितीचे संचालक

विकास सोसायट्यांमधून : 11

ग्रामपंचायत मतदारांमधून : 04

व्यापाऱ्याांमधून : 02

हमाल-तोलारमधून : 01

एकूण संचालक : 18

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com