सोलापूर : स्थानिक स्वराज्य संस्थांवरील वर्चस्वाचा फायदा त्या त्या राजकीय पक्षांना होतोच. त्यामुळे मे २०२४ मधील लोकसभा व ऑक्टोबर २०२४ मधील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) शक्य मानली जात आहे. पण, स्थानिक पातळीवर आघाडीतील काँग्रेस (Congress) व राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) पदाधिकारी आगामी महापौर आमचाच, असे जाहीरपणे सांगत आहेत. दोन्ही पक्षाच्या स्पर्धेत शिवसेनेच्या (Shivsena उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी सावध पवित्रा घेत आम्ही महाविकास आघाडीसोबतच राहणार असल्याचे सांगत आहेत. मात्र, जागांबाबत बोलणे टाळत आहेत. (Solapur Municipal Election : Shiv Sena will face a dilemma in Mahavikas Aghadi seat allocation; Formula will be 40 : 40 : 20)
दहा महिने लांबणीवर पडलेली महापालिका निवडणूक आता मार्च-एप्रिल महिन्यात होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अमरावती व नाशिक पदवीधर आणि नागपूर, कोकण व मराठवाडा (औरंगाबाद) शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीत चार जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप व शिंदे गटाला शह देण्यासाठी परस्परविरोधात उमेदवार देणे महाविकास आघाडीला परवडणारे नाही.
दरम्यान, आमदार रोहित पवार यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे देण्यासंदर्भात केलेले वक्तव्य काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या खूपच जिव्हारी लागले आहे. तत्पूर्वी, तीनही पक्षांनी सोलापूर शहरात आपापल्या पद्धतीने ताकद वाढविण्याचे नियोजन आखले आहे. काँग्रेस सातत्याने वॉर्डनिहाय कार्यक्रम राबवत आहे. राष्ट्रवादीने पण तसे नियोजन केले आहे. तसा प्रयोग मागील अनेक महिन्यांपासून ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दिसलेला नाही. त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत ४०-४०-२० टक्के असा तीनही पक्षांचा फॉर्म्युला ठरू शकतो, अशी चर्चा आहे. त्यात पुन्हा वंचित बहुजन आघाडीसह इतर राजकीय पक्षांनी महाविकास आघाडीसोबत लढण्याचा निर्णय घेतल्यास त्यांना देखील काही जागा सोडाव्या लागतील. त्या जागा ठाकरे गटालाच सोडाव्या लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेचे संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांना शहरातील प्रत्येक वॉर्डासह गावागावातील शिवसैनिकांपर्यंत थेट पोचता येईल, असे नियोजन करावे लागणार आहे. नाहीतर आघाडीच्या जागा वाटपात त्यांची पंचाईत होईल, असेही राजकीय जाणकारांचे मत आहे.
शिवसेना आहे कुठे?
बेरोजगारी, महागाई आणि महापुरुषांबद्दल आक्षेपार्ह विधाने व अदानी प्रकरणावर काँग्रेस, राष्ट्रवादी सातत्याने रस्त्यावर उतरत आहे. पण, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रवाहात फारशी कुठेच दिसत नाही. ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्ह्यात पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, अमर पाटील, धनंजय डिकोळे व संभाजी शिंदे असे पाच जिल्हाप्रमुख आहेत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी पक्षात बंडखोरी झाल्यानंतर जनतेचा कौल आपल्याच बाजूने आहे का, याची चाचपणी वारंवार होणे अपेक्षित असतानाही पदाधिकारी मात्र निवांतच असल्याची जिल्हाभरात स्थिती आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस केवळ २० टक्केच जागा ठाकरे गटाला देईल, असे बोलले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.