Solapur News : माढ्यात भाजप खासदाराच्या गाडीपुढं शेतकऱ्यांनी फेकली गाजरं; निंबाळकरांच्या अडचणी वाढल्या

Ranjitsinh Naik Nimbalkar News : खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केलेला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा असताना आता मतदारसंघातून विरोध होऊ लागला आहे, त्यामुळे निंबाळकर यांच्यापुढे दुहेरी अडचणी निर्माण झाल्या आहेत.
Ranjitsinh Naik Nimbalkar
Ranjitsinh Naik NimbalkarSarkarnama

Madha News : माढ्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यापुढे पक्षातून आव्हान उभे राहिलेले असताना आता सर्वसामान्य शेतकऱ्यांमधून त्यांच्यावर रोष व्यक्त होऊ लागला आहे. माढा तालुक्यातील रांजणी येथे भाजपच्या शेतकरीविरोधी धोरणांचा खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या गाडीपुढे गाजरं टाकून शेतकऱ्यांनी निषेध केला. निंबाळकर यांच्यासमवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदेही होते.

भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) हे आज माढा (Madha) मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत. माढा तालुक्यातील रांजणी येथे विविध विकास कामांचे उद्‌घाटन खासदार निंबाळकर आणि आमदार बबनराव शिंदे (Babanrao shinde) यांच्या हस्ते होणार होते. त्या कार्यक्रमासाठी आमदार आणि खासदार हे रांजणीकडे निघाले होते. त्यावेळी हा प्रकार घडल्याने सोलापूरमध्ये (Solapur) मोठी खळबळ उडाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Ranjitsinh Naik Nimbalkar
Mahaaghadi Seats Allotment : 'कोल्हापूर सोडतो; पण सांगली द्या' : ठाकरेंच्या मागणीमुळे काँग्रेस हडबडली!

भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या आमदार-खासदारांच्या विरोधात शेतकरी आक्रमक होऊ लागले आहेत. त्याची प्रचिती आज माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संदर्भात आली. शेतीमालाला भाव मिळत नसल्याने शेतकरी भाजपवर चांगलेच वैतागले आहेत.

दरम्यान, खासदार निंबाळकर यांच्या उमेदवारीला मोहिते पाटील यांनी कडाडून विरोध केलेला आहे. त्यामुळे उमेदवारीसाठी तगडी स्पर्धा असताना आता मतदारसंघातून विरोध होऊ लागला आहे, त्यामुळे निंबाळकर यांच्यापुढे दुहेरी अडचणी निर्माण झाल्या आहेत.

कुठल्याही राज्यातून मागणी केलेली नसतानाही भाजपच्या केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी करून टाकली. त्याचा मोठा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर झाला. बहुतांश शेतकऱ्यांना आपला कांदा सात आणि आठ रुपये किलो भावाने विकावा लागला. निर्यातबंदी उठविण्याची मागणी करूनही ती अजून उठविण्यात आलेली आहे. काही ठराविक कंपन्यांना ठराविक देशात कांदा निर्यातीची परवानगी देण्यात आलेली आहे. मात्र, बाजारभाव काही वाढताना दिसत नाहीत.

Ranjitsinh Naik Nimbalkar
Shirur Lok Sabha News: राष्ट्रवादीतून आढळरावांच्या उमेदवारीस तीन वेळा इच्छुक असलेल्या माजी आमदाराचा विरोध; बंडाच्या तयारीत...

दुसरीकडे, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचीही तीच स्थिती आहे. द्राक्ष २५ रुपये आणि ३० रुपये किलो भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भरमसाठ खर्च करूनही द्राक्ष उत्पादकांच्या हाती काहीही लागत नसल्याने अनेकांनी बागा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा परिणाम म्हणून भाजपच्या लोकप्रतिनिधींवर शेतकरी राग काढताना दिसत आहेत.

भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि राष्ट्रवादीचे आमदार बबन शिंदे ज्या रस्त्याने रांजणी येथील विकास कामांच्या उद्‌घाटनासाठी येणार होते, त्या रस्त्यावर व त्यांच्या गाडी पुढे शेतकऱ्यांनी गाजरं टाकून त्यांचा निषेध केला. शेतकऱ्यांच्या निषेधाचा हा व्हिडिओ सोशल मीडियात प्रचंड व्हायरल झाला आहे.‌

Edited By : Vijay Dudhale

Ranjitsinh Naik Nimbalkar
Amit Shah Maharashtra : महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार? अमित शाहांची शिंदे-फडणवीस-पवारांसोबत 'या' दिवशी बैठक

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com