MNS VS Amol Mitkari : ‘हा कसला आमदार..? पुन्हा आमच्या नादी लागला तर...’ : सोलापूरच्या मनसे नेत्यांचा मिटकरींना इशारा

MNS Solapur Leader : अमोल मिटकरी हे आतापर्यंत मोठमोठ्या लोकांच्या विरोधात बोलायचे. प्रसिद्धी मिळवायचे. अजितदादांंचं लांगूनचालून करायचं, अशा पद्धतीने त्यांनी काम केले आहे. त्यांना वाटत होतं की, त्यांना कोणी उत्तर देत नाही. त्यामुळे ते मस्तवाल झाले होते.
Amol Mitkari-Dilip Dhotre
Amol Mitkari-Dilip DhotreSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 02 August : अमोल मिटकरी हा भुरटा आहे. हा कसला आमदार? लांगूनचालन करून, हुजरेगिरी करून त्याने आमदारकी मिळविली आहे. भूरटा माणूस तो, त्याला चोप कमी पडला आहे. त्या दिवशी तो पळून गेला, लपून बसला.

आता तो पुन्हा आमच्या नादी लागला तर काय असतं, ते आम्ही त्याला सांगू, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांनी आमदार अमोल मिटकरी यांना दिला.

आमदार मिटकरी (Amol Mitkari) यांनी मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर त्यांच्यावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला होता. त्यावरून मिटकरी आणि मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांमध्ये जुंपली आहे. त्यात आता सोलापूरच्या कार्यकर्त्यांनीही मिटकरी यांना इशारा दिला आहे.

अमोल मिटकरी हे आतापर्यंत मोठमोठ्या लोकांच्या विरोधात बोलायचे. प्रसिद्धी मिळवायचे. अजितदादांंचं लांगूनचालून करायचं, अशा पद्धतीने त्यांनी काम केले आहे. त्यांना वाटत होतं की, त्यांना कोणी उत्तर देत नाही. त्यामुळे ते मस्तवाल झाले होते.

ते ज्यावेळी आमच्या दैवतावर बोलले, त्या वेळी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चोप दिला आहे. त्यांना चोप कमी पडला आहे. त्या दिवशी ते पळून गेले आणि लपून बसले. आता ते जर पुन्हा आमच्या नादी लागले तर काय असतं, ते आम्ही त्यांना सांगू, असेही दिलीप धोत्रे यांनी म्हटले आहे.

Amol Mitkari-Dilip Dhotre
Abhijeet Patil : अभिजीत पाटलांचे भालके अन्‌ बबनदादांना चॅलेंज; म्हणाले, ‘अभिजीतची त्यांना भीती वाटू लागलीय’

धोत्रे म्हणाले, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे हे येत्या रविवारी आणि सोमवारी सोलापूरच्या दौऱ्यावर येत आहे. राज ठाकरे यांचा रविवारी रात्री मुक्काम असणार आहे. त्यानंतर सोमवारी ते सोलापूर जिल्ह्यातील विधानसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत. इच्छुकांची बैठकी आणि काही पक्षप्रवेश होणार आहेत. हा कार्यक्रम विश्रामगृहात होणार आहे.

सध्या महाराष्ट्रात राज ठाकरे हे पक्ष पदाधिकाऱ्यांच्या केवळ आढावा बैठक घेणार आहेत. त्यानंतर ते राज्यात सभा घेणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात आम्ही ताकदवान उमेदवार उभे करू. प्रत्येक मतदारसंघात पक्षाकडे दहा ते बारा जण इच्छूक आहेत. अनेक लोक आमच्याकडे येण्यासाठी इच्छुक आहेत. पण आमचं प्राधान्य मनसे कार्यकर्त्यांना असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.

Amol Mitkari-Dilip Dhotre
Pankaj Sable: मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे यांचा मिटकरींवर पलटवार; जय मालोकार याचे नाव FIR कुणी टाकलं?

दोन्ही राष्ट्रवादी, दोन्ही शिवसेना आणि काँग्रेस, भाजपला जनता आता कंटाळून गेली आहे. लोकांची अपेक्षा आता राज ठाकरे यांच्याकडून आहे. त्यामुळे राज्यातील जनता आता राज ठाकरेंच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com