Thackeray Vs Shinde राऊतांच्या प्रतिमेला एकीकडे जोडे मारले, तर दुसरीकडे दुग्धाभिषेक केला : शिरूरमध्ये शिंदे-ठाकरे गट आमने सामने

Protest in Shirur: एकमेकांचा बंदोबस्त करण्याचा आणि जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही दोन्ही गटांचे स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांनी दिला.
Shirur Shivsena
Shirur ShivsenaSarkarnama

शिरूर (जि. पुणे) : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी आमदार संजय शिरसाट आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नाव घेत थुंकण्याच्या कृतीवर त्यांच्या निषेधार्थ शिरूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी जोडे मारो आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी समर्थनार्थ आंदोलन करत राऊत यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. (Shiv Sena's Shinde faction and Thackeray faction protest in Shirur)

या आंदोलनाच्या निमित्ताने शिंदे आणि ठाकरे गट (Thackeray Group) भगवे झेंडे नाचवत रस्त्यावर उतरले होते. एका बाजूला 'संजय राऊत झिंदाबाद'च्या तर दुसऱ्या बाजूला 'संजय राऊत मुर्दाबाद'च्या घोषणांनी शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. एकमेकांचा बंदोबस्त करण्याचा आणि जशास तसे उत्तर देण्याचा इशाराही दोन्ही गटांचे स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिकांनी दिला.

Shirur Shivsena
Baramati Loksabha : बारामतीत राजकीय हालचालींना वेग; केंद्रीय मंत्र्यांपाठोपाठ सुप्रिया सुळेही इंदापुरात, पाटलांच्या गावात जाणार

शिंदे गटाच्या (Eknath Shinde Group) कार्यकर्त्यांनी थुंकी बहाद्दराच्या निषेधार्थ फलक फडकावले, तर ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है’च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. दोन गटातील या आंदोलनामुळे शिवसेनेतील (Shivsena) गटबाजीसह राजकीय वातावरण चिघळल्याचे दिसून आले.

खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीवर सर्वत्र चर्चा चालू आहे. शिवसेनेचे दोन्ही गट आंदोलनाच्या माध्यमातून एकमेकांविरोधात उभे ठाकल्याने काही काळ शिरूर शहर व परिसरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी येथील बाजार समितीच्या आवारातील शिवरायांच्या पुतळ्याजवळ राऊत यांच्या निषेधार्थ आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले.

Shirur Shivsena
Padalkar On Sharad Pawar : पडळकर पुन्हा पवारांवर घसरले; एकेरी उल्लेख करत या वर्षी चौंडीत न येण्याचे कारण विचारले

शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अनिल काशीद, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, शहर प्रमुख मयुर थोरात, पुणे जिल्हा समन्वयक आनंदा हजारे, उपतालुकाप्रमुख गणेश कोतवाल, तालुका संघटक संतोष गव्हाणे, उपशहर प्रमुख भरत जोशी, गणेश गिरे, सागर गव्हाणे, राजेंद्र जाधव, विजय गव्हाणे, सतिश गव्हाणे, विशाल जाधव, नाना पाचर्णे, संतोष वर्पे आदी उपस्थित होते. राऊत यांच्या प्रतिमेला महिलांनी जोडे मारले. संजय राऊत हाय हाय च्या घोषणा देत शिवसैनिकांनी निषेध नोंदविला.

राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारण्याच्या कृतीचा निषेध म्हणून ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घातला. .शिरूर येथील नगर परिषद कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी संजय राऊत अंगार है, बाकी सब भंगार है च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा समन्वयक राजाभाऊ शिंदे, तालुकाप्रमुख पोपट शेलार, शहर प्रमुख संजय देशमुख, माजी नगरसेवक मंगेश खांडरे, खुशाल गाडे, पप्पू गव्हाणे, महादेव कडाळे, कुंडलिक पवार, आकाश खांडरे, राजेंद्र चोपडा, दिलीप पवार, अविनाश ढवळे, गणेश चौधरी, ऋषिकेश दळवी, योगेश गोपाल आदी यावेळी उपस्थित होते.

Shirur Shivsena
Ajit Pawar News : ‘लाँग मार्च’ काढून प्रश्न सुटत नसतात; अजित पवारांचा ‘CPM’च्या जे. पी. गावितांना टोमणा

थुंकण्यासारखी हीन कृती करणे निषेधार्ह : सासवडे

मोठ्या नेत्यांच्या कृतीवर बोलणे योग्य नाही. तथापि, राजकीय संस्कृती, सभ्यता पाळली गेली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे काम करीत आहे. आमदार संजय शिरसाट हे उत्तम काम करीत आहेत, त्यामुळे त्यांची नावे समोर येताच थुंकण्यासारखी हीन कृती करणे निषेधार्ह आहे, असे शिवसेना शिंदे गटाचे शिरूर तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे यांनी सांगितले.

लाचारांना जशास तसे उत्तर देऊ : शेलार

संजय राऊत हे अनुभवी, ज्येष्ठ नेते असून, मिंधे गटातील कुणाचीही त्यांच्या जोड्याजवळ देखील उभे राहण्याची लायकी नाही. त्या गद्दारांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारणे निषेधार्ह आहे. फक्त आपले अस्तित्व दाखवण्यासाठी लाचारांनी हे आंदोलन केले असून, अशा लाचारांना जशास तसे उत्तर दिले जाईल. पळता भुई थोडी करू, असे प्रत्युत्तर शिवसेना ठाकरे गटाचे शिरूर तालुकप्रमुख पोपट शेलार यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com