Ashadhi Wari : आषाढी वारीच्या काळात मोबाईल बंद ठेवाल, तर कठोर कारवाई केली जाईल : विभागीय आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा

Sheetal Teli Ugale Warns Officer : आषाढी वारी काळात अधिकारी-कर्मचाऱ्यांनी रजा घेऊ नये, मोबाईल सुरू ठेवावेत, अन्यथा कठोर कारवाई होईल, असा इशारा विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी दिला.
Sheetal Teli Ugale
Sheetal Teli UgaleSarkarnama
Published on
Updated on

Pandharpur, 06 June : आषाढी वारीच्या काळात कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याने रजा घेऊ नये. तसेच, वरिष्ठांनीही त्यांच्या रजा मंजूर करू नयेत. या कालावधीत कोणाचाही मोबाईल बंद आढळल्यास संबंधितांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पुणे विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी पंढरपुरात आढावा बैठकीत दिला आहे.

पुण्याच्या विभागीय आयुक्त शीतल तेलगी उगले यांनी पंढरपुरात जाऊन आषाढी वारीच्या आढाव्याची बैठक घेतली. त्यात त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रजेवरून आणि कामचुकार करणाऱ्यांना इशारा दिला. त्या म्हणाल्या, आषाढी वारी यशस्वी करण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वय राखून ‘एक टीम’ म्हणून काम करावे.

पालखीतळ, विसावा आणि मुक्काम स्थळे तसेच पालखी मार्ग ज्या ग्रामपंचायत, नगरपालिका हद्दीत येतात, त्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी पालखी पुढे गेल्यानंतर चार ते पाच तासांत स्वच्छता मोहीम राबवावी. वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. कायमस्वरूपी व तात्पुरती शौचालये दिवसातून किमान तीन ते चार वेळा स्वच्छ करण्यात यावीत, त्यासाठी पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध ठेवावे, अशी सूचना तेली उगले यांनी केली.

Sheetal Teli Ugale
Sangli-Satara MLC : ‘शिवसेना-राष्ट्रवादीला भाजपबाबत फार प्रेम असण्याचं कारण नाही; ते स्वाभिमानाची लढाई लढतील’

प्रकाशयोजना, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि आरोग्य पथके सक्षमपणे कार्यरत ठेवण्याचे निर्देश त्यांनी दिले. वारी कालावधीत सर्व भाविक व वारकऱ्यांना व्हिटॅमिन ‘ए’ आणि ‘डी’च्या गोळ्यांचा शंभर टक्के पुरवठा करण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या.

Sheetal Teli Ugale
Ramdas Patil Sumthankar : तासाभरात माझे तिकीट कापले; तेरा सदस्य असलेल्या ठाकरेंच्या पक्षाला जागा का सोडली? माघार घेतलेल्या उमेदवाराचा सवाल

या वेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त आयुक्त तुषार ठोंबरे, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज, प्रांताधिकारी सचिन इथापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com