
Solapur, 18 August : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीपासून काँग्रेसचे माजी आमदार तथा बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे. माने यांच्या भेटीगाठी आणि राजकीय हालचाली त्याच पद्धतीने होताना दिसून येत आहेत. मात्र, त्याबाबत खुद्द माने किंवा भाजप नेत्यांकडून कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. मात्र, माने यांचे कट्टर राजकीय विरोधक माजी सहकार मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी आज (ता. 18 ऑगस्ट) उपरोधिकपणे मोठे विधान केले आहे.
लोकमंगल फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने (Dilip Mane) यांच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेबाबत आमदार देशमुख यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येकाने भाजपत यावं, असं उपरोधिक विधान केले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने भारतीय जनता पक्षात यावं. त्यांना काही असेल तर त्याला आम्ही ‘ड्रायक्लिनर’मध्ये टाकून स्वच्छ करू आणि संपूर्ण सोलापूर जिल्हा भाजपमय करण्याचा आम्ही प्रयत्न करू, असे उपरोधिक विधान माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांनी केले आहे. माजी आमदार मानेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुरू असलेल्या चर्चेवर आमदार देशमुख यांनी उपरोधिक भाष्य केले आहे.
दरम्यान, माजी आमदार दिलीप माने हे आमदार सुभाष देशमुख यांचे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातील पारंपारिक राजकीय विरोधक आहेत. दिलीप माने दक्षिण सोलापूरमधून २००९ मध्ये शिवसेनेचे रतिकांत पाटील यांचा पराभव करून निवडून आले होते. तर, २०१४ च्या निवडणुकीत सुभाष देशमुख यांनी माने यांचा पराभव केला होता. तेव्हापासून ते एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळखले जातात.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतही माजी आमदार दिलीप माने आणि काँग्रेसचे सुरेश हसापुरे यांच्याशी युती करण्यास सुभाष देशमुख यांचा विरोध होता. मात्र, अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार माने आणि हसापुरे यांच्याशी युती करून बाजार समितीची निवडणूक लढवली हेाती. त्याला भाजपचे सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन विरोध केला हेाता. त्यामुळे माने-देशमुख यांच्यात राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी आहे, त्यामुळे देशमुख यांच्या विधानाला विशेष महत्व आहे.
‘...हा ज्याचा त्याचा प्रश्न’
तुम्ही चांगली जागा शोधा; मी तुम्हाला एमआयडीसीच्या माध्यमातून उद्योग उभारून देतो, असे जाहीर आश्वासन सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदारसंघातील दहिटणे येथील सदनिकांच्या लोकार्पणाच्या कार्यक्रमात दिले. मात्र, त्यावरून आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. त्यावर सुभाष देशमुख यांनी ‘कोणी काय करावे, हा जाता त्याचा प्रश्न आहे,’ असे उत्तर दिले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.