
Solapur, 20 April : सोलापूरमधील प्रसिद्ध न्युरोफिजीशियन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात नवी अपडेट समोर आली असून डॉक्टरांच्या पॅन्टच्या डाव्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली आहे. त्यातील मजकुरानुसार डॉ वळसंगकर रुग्णालयातील प्रशासकीय अधिकारी मनीषा महेश मुसळे-माने हिच्यावर गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे. डॉ. वळसंगकर यांनी चिठ्ठीत मनीषा मुसळे-माने हिच्यामुळे आपण जीवन संपवत असल्याचे म्हटले आहे.
डॉ. शिरीष वळसंगकर (Dr. Shirish Valsangkar) यांनी शुक्रवारी रात्री पिस्टलमधून दोन गोळ्या झाडून आत्महत्या केली होती. आत्महत्येनंतर मृतदेहाच्या उत्तरीय तपासणीवेळी डॉक्टरांच्या पॅन्टच्या डाव्या खिशात चिठ्ठी मिळाली होती. त्या चिठ्ठीत मनीषा मुसळे-माने हिला आत्महत्येस जबाबदार धरण्यात आलेले आहे.
चिठ्ठीत डॉ. वळसंगकर यांनी म्हटले आहे की, ‘ज्या माणसाला मी शिकवून आज ‘एओ’ (प्रशासकीय अधिकारी) केले आहे आणि चांगला पगार देतो आहे, त्यानेच माझ्यावर घाणेरडे आरोप करून मला धमकावले आहे, त्याचे मला अतीव दु:ख होत आहे आणि म्हणून मी जीवन संपवत आहे’ असे लिहून त्याखाली शिरीष असे लिहले आहे. त्या मजकुरात मुसळे असे नमूद केलेले आहे.
दरम्यान, अश्विन शिरीष वळसंगकर यांनी सदर बझार पोलिस (Police) ठाण्यात मनीषा मुसळे-माने हिच्या विरोधात फिर्याद दिली होती. अश्विन यांनी ती चिठ्ठी पाहिली, त्यावरील अक्षर डॉ. शिरीष वळसंगकर यांचेच असल्याचे म्हटले आहे. मनीषा मुसळे-माने हिच्या आरोपामुळे आलेल्या नैराश्यातूनच डॉ. वळसंगकर यांनी स्वत:च्या राहत्या घरातील बाथरूममध्ये जाऊन गोळी झाडून आत्महत्या केली होती.
सदर बझार पोलिसांनी शनिवारी (ता. 18 एप्रिल) रात्री अकराच्या सुमारास मनीषा मुसळे हिला अटक केली होती. अटकवेळी तिचा पती महेश माने यांना त्याबाबतची कल्पना देण्यात आली होती, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, मनीषा मुसळे-माने हिला आज सोलापूरच्या न्यायालयात उभे करण्यात आले होते. त्या वेळी तिला तीन दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.