वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या

अहमदनगर शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीने वसतीगृहात आत्महत्या केली.
Suicide
Suicide Sarkarnama
Published on: 
Updated on: 

suicide : अहमदनगर शहरातील एका वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीने वसतीगृहात आत्महत्या केली. या प्रकारामुळे महाविद्यालय परिसरात शोकाकूल वातावरण आहे. या विद्यार्थिनीने आत्महत्या का केली याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. प्रीती मिलिंद इंगळे (वय 20, रा. मुंबई) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे.

विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. अहमदनगर शहरातील नागापूर उपनगरात काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयात विद्यालयाच्या वसतीगृहात बुधवारी (ता. 31) ला ही घटना घडली. प्रीती इंगळे ही दोन वर्षांपासून काकासाहेब म्हस्के वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती.

Suicide
खासगी सावकारांच्या जाचाने फलटण तालुक्‍यातील उपसरपंचाची आत्महत्त्या 

तिने मंगळवारी (ता. 30) रात्री वसतीगृहामधील तिच्या खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी नऊ वाजता तिच्या शेजारी राहणाऱ्या विद्यार्थिनींच्या ही बाब लक्षात आली. त्यांनी वसतीगृहाचे पर्यवेक्षक नीलेश रामा केदारे यांना ही माहिती दिली. त्यांनी तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकारी डॉ. खटके यांनी तपासणी करून उपचारापूर्वीची ती मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.