Sunetra Pawar Satara Tour : सुनेत्रावहिनींचा पवारांच्या बड्या नेत्याला निरोप; साताऱ्यातील नव्या राजकीय घडामोडींचे संकेत

Balasaheb Patil News : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी कऱ्हाड येथे यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. त्यावेळी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी केलेल्या संवादामुळे साताऱ्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Balasaheb Patil-Sunetra Pawar
Balasaheb Patil-Sunetra PawarSarkarnama
Published on
Updated on

Karad, 13 March : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त कऱ्हाड (जि. सातारा) येथील त्यांच्या समाधीस्थळी अभिवादन केले. उपमुख्यमंत्री पवार यांच्या या दौऱ्यात माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील हे शेवटपर्यंत होते. समाधीस्थळावरून वाहनात बसून निघताना त्यांनी माजी मंत्री पाटील यांना हाक मारून ‘बाळासाहेब, आपण नंतर भेटून बोलू’ असे सांगीतले. त्यामुळे सुनेत्रावहिनींचा तो निरोप सध्या जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. सुनेत्रा पवार यांच्या मनात नेमके काय आखाडे चालू आहेत, याबाबत सध्या उत्सुकता शिगेला पोचली आहे.

कऱ्हाडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी समाधीस्थळी पुष्पचक्र अर्पण करून चव्हाण यांना अभिवादन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांशी त्यांनी संवाद साधला. याच वेळी माजी मंत्री पाटील यांच्याशीही त्यांची भेट झाली.

कार्यक्रम आटोपल्यानंतर सुनेत्रा पवार निघण्यासाठी वाहनात बसल्या. त्या वेळी त्यांनी माजी मंत्री पाटील यांना हाक मारत आपण नंतर भेटून बोलू, असे सांगितले. या छोट्या संवादानंतर राजकीय चर्चा सुरु झाल्या आहेत. सातारा (satara) जिल्ह्यातील बदलत्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या संवादाकडे उत्सुकतेने पाहिले जात आहे.

Balasaheb Patil-Sunetra Pawar
Sunetra Pawar News : सुनेत्रा पवारांचा पक्षपातळीवर मोठा निर्णय; राष्ट्रवादीच्या प्रत्येक आमदाराशी बोलूनच पुढील फैसला, कार्यक्रम ठरला...

सातारा जिल्ह्यात निवडणुकांच्या निमित्ताने अनेक राजकीय समीकरणे बदलली आहेत. काही नवीन समीकरणे तयार झाली आहेत. साध्या भेटीतूनही मोठ्या राजकीय घडामोडी घडतात, असा अनुभव असल्याने या भेटीकडे स्थानिक राजकीय नेते आणि कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. विशेषतः कऱ्हाड आणि सातारा जिल्ह्यातील राजकारणात याचे काही परिणाम दिसून येतात का, याबाबतही उत्सुकता व्यक्त होत आहे.

Balasaheb Patil-Sunetra Pawar
Budget Session : फडणवीस सरकारवर विधानसभेत नामुष्की; मंत्री-सचिवांच्या गैरहजेरीमुळे तालिका अध्यक्षांनी घेतला ‘हा’ कटू निर्णय

उपमुख्यमंत्री पवार आणि माजी मंत्री पाटील यांची संभाव्य भेट केवळ औपचारिक राहणार की त्यातून काही ठोस राजकीय संदेश बाहेर येणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. यामुळे कऱ्हाडमधील या छोट्याशा संवादाने जिल्ह्यातील राजकारणात उत्सुकता आणि चर्चा निर्माण केली असून, पुढील काही दिवसांत या भेटीचे राजकीय अर्थ लावले जातील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com