Mohite Patil Group : मोहिते पाटलांनी बोलावलेल्या बैठकीला समर्थक आमदाराची दांडी: मतभेदांच्या चर्चेला उधाण...

Karmala Scarcity Review Meeting : करमाळा बैठकीला नारायण पाटील अनुपस्थित राहिल्याने मोहिते पाटील यांच्याशी मतभेद वाढल्याची चर्चा रंगली आहे. या घडामोडीमुळे सोलापूर राजकारणात तणाव वाढला आहे.
Karmala Scarcity Review Meeting
Karmala Scarcity Review MeetingSarkarnama
Published on
Updated on

Solapur, 05 May : खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या करमाळा तालुका टंचाई आढावा बैठकीकडे आमदार नारायण पाटील यांनी पाठ फिरवली. मोहिते पाटील यांनी बोलावलेल्या बैठकीला आमदार पाटील यांनी दांडी मारल्याने तालुक्यात तर्कवितर्काला उधाण आले आहे. मोहिते पाटील आणि नारायण पाटील यांच्यात मतभेद निर्माण झाल्याची गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. त्यात अंतर पडल्याच्या चर्चेला पाटील यांच्या दांडीतून दुजोरा मिळत आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या करमाळा पंचायत समितीच्या टंचाई आढावा बैठकीचे सोमवारी (ता. 04 मे) खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आयोजन केले होते. करमाळ पंचायत समितीच्या सभागृहात झालेल्या बैठकीला आमदार नारायण पाटील (Narayan Patil) यांनी निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही दांडी मारली. त्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे.

नारायण पाटील हे मोहिते पाटील (Mohite Patil) यांचे समर्थक आमदार मानले जातात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यामध्ये मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या एबी फार्मवरून आणि पसंतीच्या उमेदवारांवरून दोघांमध्ये बिनसल्याची चर्चा आहे. मात्र, आता थेट दोघे एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याचे टाळत असल्याचे दिसून येत आहे.

दरम्यान, या टंचाई आढावा बैठकीला आमदार नारायण पाटील यांनी आपले प्रतिनिधी म्हणून आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक देवानंद बागल यांना पाठविले होते. तसेच, पाटील यांचे कार्यकर्तेही या बैठकीला उपस्थित होते.

Karmala Scarcity Review Meeting
Devendra Fadnavis :फडणवीसांनी तातडीने राजीनामा द्यावा; त्यांच्यात माणुसकीच राहिलेली नाही : प्रणिती शिंदेंचा आरोप

खासदार धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, सर्वजण आपापल्या प्रशासकीय कामात अडकले होते. मी दिल्लीच्या अधिवेशनात अडकला होतो. आमदार नारायण पाटील यांना टंचाईचा आढावा घ्यायचा होता आणि प्रशासनाला डीपीसीच्या बैठकीत पालकमंत्र्यांना माहिती द्यायची होती. मी या दोघांकडून आकडेवारी घेतली असती पण केंद्राच्या वॉटर रिर्सोसमध्ये उपस्थित केला होता, तो सर्वांना माहिती व्हावा आणि जनतेच्या समस्या त्यांच्याकडूनच जाणून घ्यायच्या होत्या.

Karmala Scarcity Review Meeting
Election Result : धक्कादायक निकाल : मातब्बर नेत्याचा एका मतानं पराभव; तीनवेळा मतं मोजली, पण झटका बसलाच...

नारायण पाटील यांच्या अनुपस्थितीबाबत ते म्हणाले की, पूर्वनियोजित कामामुळे आमदार आजच्या बैठकीला येऊ शकले नाहीत. त्यांचे प्रतिनिधी देवानंद बागल उपस्थित आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष आहेत आणि मी आहे ना. प्रतिनिधी पाठवू नये, हे फक्त अधिकाऱ्यांसाठी होते, पुढाऱ्यांसाठी नव्हते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com