Ajit Pawar : तुमच्याकडून सांगितली जाईल तेवढी आर्थिक तरतूद विधी व न्याय विभागाला केली जाईल : अजित पवार

Indapur Additional District Sessions Court : इंदापुरात पुणे जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उद्‌घाटन उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते करण्यात आले
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Indapur, 25 January : इंदापूर : इंदापूर येथील पुणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या इमारतीचे उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती रेवती मोहिते डेरे यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींसह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे हेही उपस्थित होते

इंदापूर (Indapur) येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आवारात पुणे जिल्हा सत्र व अतिरिक्ति न्यायालयाचे प्रमुख न्यायमूर्ती महेंद्र महाजन यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमाला उच्च न्यायलयाचे न्यायमूर्ती न्यायमूर्ती संदीप मारणे, आरिफ सा. डॉक्टर यांच्यासोबत उपमुख्यमंत्री पवार, क्रीडामंत्री भरणे, खासदार सुप्रिया सुळे, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील हेही उपस्थित होते.

या वेळी क्रीडा मंत्री दत्तात्रेय भरणे, उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची भाषणे झाली. ते म्हणाले, येत्या फेब्रुवारी महिन्यात केंद्र सरकारचा अर्थसंकल्प सादर होईल. त्यानंतर मार्च महिन्यात राज्य सरकाचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे, त्यात कोणत्या विभागाला किती तरतूद करायची, हेच काम सध्या अर्थ मंत्रालयाचे चालले आहे.

Ajit Pawar
Nagpur Politic's : काँग्रेसच्या आंदोलनाची बावनकुळेंनी उडवली खिल्ली; म्हणाले ‘हे तर फक्त फोटोसेशन...’

विधी आणि न्याय विभागाच्या सचिवांकडून जी काही माहिती येईल आणि तरतूद करायला सांगितली जाईल, तेवढी सगळी तरतूद आमच्या सरकारडून विधी आणि न्याय विभागाला करण्यात येईल, असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरच्या कार्यक्रमातून दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com