Kolhapur Crime: कोल्हापुरात गुंड सूरज साखरे गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट : रस्त्याचं काम बंद पाडलं म्हणून महापालिकेच्या कंत्राटदारानेच आखला गेम करण्याचा प्लॅन

Kolhapur contractor planned attack: सूरज साखरे गोळीबार प्रकरणात महापालिका कंत्राटदार गणेश खाडे याने राजकीय वैर आणि आर्थिक वादातून सुपारी दिल्याचा पोलिसांचा दावा आहे. या प्रकरणातील अनेक आरोपी न्यायालयीन कोठडीत आहेत.
Suraj Sakhare Firing Case
Suraj Sakhare Firing CaseSarkarnama
Published on
Updated on

Suraj Sakhare Shooting Case: कोल्हापूर महापालिका निवडणुकीत वडील रमेश खाडे यांच्याविरोधात प्रचार व आंदोलन केल्याच्या रागातून गुंड सूरज साखरे याची हत्या करण्याचा प्लॅन महापालिका कंत्राटदार गणेश रमेश खाडे याने रचल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हल्लेखोरांना एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स देऊन त्यांच्या अटकेनंतरची 'सर्व जबाबदारी घेतो' असा शब्दही खाडेने दिल्याचे संशयितांनी पोलिसांना सांगितले.

अधिक माहिती अशी, सूरज साखरेवर १६ जुलैला क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकात गोळीबार झाला होता. याप्रकरणी शूटर रफिक मुल्ला व त्याच्या साथीदार शाहबाज मुल्ला याला पोलीसांनी अटक केली. या दोघांची पोलिस कोठडीची मुदत संपल्याने आज न्यायालयात हजर केले होते.

Suraj Sakhare Firing Case
Vilas Ghule Case: बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांना विलास घुले हत्येप्रकरणात मोठा धक्का; पोलिसांकडून 14 दिवसांनंतर निकटवर्तीयावर गुन्हा दाखल

त्यांच्यासह सुपारी घेणाऱ्या राकेश कारंडेसह पिस्तूल आणणारा दीपक विश्वकर्मा, यश खैरे यालाही न्यायालयासमोर हजर केले. या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे.

दरम्यान, कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत वडिलांविरोधात गुंड सूरज साखरे याने महापालिका प्रभाग आठमधील भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला होता. याच भागात गणेश खाडे याचे वडील रमेश खाडे जनसुराज्य पक्षाकडून रिंगणात होते. यामध्ये खाडे यांचा पराभव झाला. खाडे यांच्या प्रचारातील अनेक मुद्दे खोडून काढण्याचे काम साखरे करत होता. याचा राग गणेश खाडेच्या मनात होता.

गणेश खाडे हा महापालिकेचा नोंदणीकृत कंत्राटदार आहे. २०१० आणि २०१५ मध्ये त्याने स्वतः महापालिकेची निवडणूकही लढवली होती. परंतु, तो पराभूत झाला, तर नुकत्याच झालेल्या निवडणुकीत त्याच्या वडिलांना अवघ्या साडेतीनशे मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता.

महापालिकेतील आजी-माजी नगरसेवकांशी त्याची जवळची मैत्री असल्याने अनेक कामांचा ठेकाही त्यालाच मिळत होता. त्याने केलेल्या एका रस्त्याचे काम निकृष्ट असल्याचा आरोप करत साखरे याने काम बंद पाडले. याचा आर्थिक फटका खाडेला बसला होता.

Suraj Sakhare Firing Case
Hingoli Crime : जुन्या वादातून अंदाधूंद गोळीबार, एकाचा मृत्यू ; शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकासह सोळा जणांवर गुन्हा दाखल

अशा वेगवेगळ्या कामांत वारंवार साखरेची उठाठेव सुरू झाल्याने त्याला संपविण्यासाठी खाडेने ही सुपारी दिल्याचे समोर आले. सूरज साखरे याच्यावर गोळीबारासाठी गणेश खाडेने एक लाख रुपये अ‍ॅडव्हान्स दिली होती.

राकेश कारंडे याने सुपारी स्वीकारल्यानंतर रफिक आणि आरबाजला हे काम सोपवले. गोळीबारानंतर दोघांना सोडविण्याची सर्व जबाबदारीही घेण्याचा शब्द खाडे याने दिला होता. साखरेला संपवल्यानंतर नेमकी किती रक्कम मिळणार होती हे हल्लेखोरांनी अद्याप सांगितले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com