कऱ्हाड : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी) सकाळी कऱ्हाड (जि.सातारा) तालुक्यातील वाठार येथे कृष्णा साखर कारखाना व राजारामबापू साखर कारखान्यांकडे सुरू असलेली ऊस वाहतूक रोखुन धरली होती. दरम्यान याची माहिती मिळताच कऱ्हाड तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यावर पडदा टाकला.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आज आणि उद्या शुक्रवारी ऊसतोड बंद आंदोलन पुकारले आहे. त्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री इंदोली येथे ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर पेटवण्यात आला.
दरम्यान, आज सकाळी वाठार येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, स्वाभिमानी पक्षाचे तालुकाध्यक्ष रामचंद्र साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष बापूसाहेब साळुंखे व शेतकऱ्यांनी कृष्णा कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतुक रोखून धरली.
दरम्यान पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर त्यावर पडदा पडला. दरम्यान कऱ्हाड तालुका पोलिसांनी तालुक्यात मोठा फौजफाटा तैनात केला आहे. आंदोलकांनी हिंसक आंदोलन केल्यास कारवाई करण्याचा इशारा कऱ्हाड तालुका पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी दिला आहे. यावेळी पीएसआय दिपज्योती पाटील यांच्यासह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.