
-हेमंत पवार
Sugarcane FRP Andolan : सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी मागील वर्षाचे 400 रुपये आणि चालू एफआरपी साडेतीन हजार जाहीर न करताच कारखाने सुरू केले आहेत. त्याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक होत आज शनिवारी कऱ्हाड (जि. सातारा) तालुक्यातील वाठार आणि पाचवड फाटा येथे ऊस वाहतूक रोखली.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे Swabhimani Shetkari Sanghtna संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी Raju Shetty यांनी मागील वर्षीच्या उसाला 400 रुपये व चालू वर्षाच्या उसाला साडेतीन हजार रुपये उचल जाहीर करावी आणि मगच साखर कारखाने सुरू करावेत, असे आवाहन जयसिंगपूर येथील ऊस परिषदेत केले होते.
सध्या जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगाम सुरू झाला आहे. मात्र, अद्यापही जिल्ह्यातील कोणत्याही साखर कारखान्याने ऊसदर जाहीर केलेला नाही किंवा मागील वर्षीचे 400 रुपये देण्याची घोषणा केलेली नाही. त्यामुळे आक्रमक होऊन स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कराड तालुक्यातून आंदाोलन सुरू केले आहे.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, राज्य कार्यकारिणी सदस्य अर्जुन साळुंखे, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब यादव, कऱ्हाड दक्षिणचे अध्यक्ष बापूसाहेब साळुंखे, उत्तरचे अध्यक्ष प्रमोद जगदाळे, पक्ष उपाध्यक्ष उत्तम साळुंखे, सातारा तालुका अध्यक्ष रमेश पिसाळ व शेतकऱ्यांनी वाठार आणि पाचवड फाटा येथे ऊस वाहतूक रोखली. Maharashtra Political News
संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यादरम्यान तालुका पोलिस निरीक्षक विजय पाटील हे फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले. साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी यांच्या आश्वासनानंतर आणि पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने ऊस वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.