
Kolhapur News : रत्नागिरी-नागपूर महामार्गाच्या आज होणा-या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यास सुरवात केली आहे. पोलिसाकडून दबाव टाकून कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. कालपासून पोलिस आंदोलन मिटविण्यासाठी प्रयत्न करत असतानाच आज (ता.15) पहाटेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
नागपूर रत्नागिरी महामार्गासाठी उर्वरित जमीन भूसंपादन करण्यासाठी शेतकऱ्यांना चौपट मोबदला द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली होती. तर याच मागणीसाठी त्यांनी आदोलनाचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज स्वाभिमानी शेतकरी संघटना आंदोलन करणार होती. मात्र आंदोलनापूर्वीच स्वाभिमानीच्या सर्व कार्यकर्त्यांची पोलिसांनी धरपकड केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नागपूर-रत्नागिरी महामार्ग मधील कोल्हापूर जिल्ह्यातील 800 एकर जमीन भूसंपादनामधील 740 एकर भूसंपादनाची प्रक्रिया पार पडली आहे. तर एकरी जमिनीसाठी चौपट मोबदला मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे. त्यामुळे या महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे. चौपट मोबदला मिळवण्यासाठी गेला काही दिवसांपासून शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे.
उपोषणाच्या पाचव्या दिवशी शेतकऱ्यांची तब्येत खालावल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून रस्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र आंदोलनाच्याआधीच जिल्ह्यातील स्वाभिमानीच्या सर्व पदाधिकारी यांना पहाटेपासून ताब्यात घेण्यास सुरवात झाली आहे.
रत्नागिरी-नागपूर महामार्गातील बाधित शेतकऱ्यांच्या उपोषणाचा पाचव्या दिवशी तब्येत खालावली. पण प्रशासनाकडू या आंदोलनाची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. त्यामुळे आज रास्ता रोको आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. याचपार्श्वभुमीवर राजू शेट्टी यांना ताब्यात घेण्यासाठी शिरोळ निवासस्थानी पोलिस दाखल झाले. सकाळी सकाळी सहा वाजता माजी खासदार शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.