Satara ZP Election : जिल्हा परिषदेसाठी माजी आमदार पुत्राची फिल्डिंग; आजी-माजी मंत्र्यांच्या पाया पडावं लागणार

Influence of Local Leaders in Tambwe ZP Elections : तांबवे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत कऱ्हाड-पाटण तालुक्यांचे स्थानिक नेते आणि आरक्षित प्रवर्ग उमेदवारांची भूमिका महत्त्वाची.
Satara ZP elections, Tambwe Gat, reserved category seats, local leader influence
Satara ZP elections, Tambwe Gat, reserved category seats, local leader influenceSarkarnama
Published on
Updated on

Satara ZP Election : विधानसभेला पाटणकडे, तर जिल्हा परिषद, पंचायत समितीला कऱ्हाड तालुक्यात असणारा तांबवे हा जिल्हा परिषद गट आहे. त्यामुळे दोन्ही तालुक्यांतील नेत्यांशी या गटातील स्थानिक नेत्यांचा कामानिमित्ताने सातत्याने संबंध येतो. त्यामुळे या गटात सर्वच नेत्यांचे गट सक्रिय आहेत. त्यामुळे यावेळच्या तांबवे जिल्हा परिषद गटातील निवडणुकीतील उमेदवार निवडीत कऱ्हाड-पाटण या दोन्ही तालुक्यांतील नेत्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

तांबवे जिल्हा परिषद गट खुला झाल्याने या गटातून निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. जिल्हा परिषदेच्या माजी सदस्यांना तेथे पुन्हा संधी चालून आली आहे. कऱ्हाड पंचायत समितीचे सभापतिपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. या गटातील सुपने गणातही खुल्या प्रवर्गातील महिलेचे आरक्षण आहे. त्यामुळे पंचायत समिती सभापतिपदाचा उमेदवार या गणात असल्याने तेथून निवडून येणारी महिला सभापतिपदाची दावेदार असू शकते. तांबवे गण नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यामुळे तेथे या प्रवर्गातून कोणाला उमेदवारी मिळावी, यासाठी काही इच्छुकांनी नेत्यांकडे गळ घातली आहे.

तांबवे गटात पाटण विधानसभा मतदारसंघात आमदार, पालकमंत्री शंभूराज देसाई, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचे गट कार्यरत आहेत. माजी सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांचाही सह्याद्री कारखान्याच्या संबंधाने तांबवे गटात संबंध येतो. त्यांचाही गट या मतदारसंघात असल्याने उमेदवार निवडीवेळी नेत्यांच्या संलग्नतेतूनच निवड केली जाते. त्यामुळे यावेळीही तीच परिस्थिती राहील, अशी स्थिती आहे.

जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गणांच्या आरक्षण सोडतीनंतर आता सर्वांचे लक्ष तांबवे गटाकडे लागले आहे. गेल्यावेळी या गटातून उंडाळकरांच्या कऱ्हाड विकास आघाडीच्या प्रदीप पाटील यांनी जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व केले. त्यावेळी त्यांना पाटणचे आमदार आणि पालकमंत्री देसाई गटाची साथ मिळाली, तर तांबवे गणातून कऱ्हाड विकास आघाडीकडून म्होप्रेच्या सविता संकपाळ आणि सुपने गणातून (कै.) सुरेखा पाटील या निवडून आल्या.

Satara ZP elections, Tambwe Gat, reserved category seats, local leader influence
Satara Politic's : कुणबी दाखला वसंतराव मानकुमरेंना पुन्हा पाठविणार झेडपीत; शिवेंद्रराजे अन्‌ शशिकांत शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष

सध्या नेत्यांची राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यातच यावेळीही पुन्हा सर्वसाधारण प्रवर्गासाठी तांबवे गट खुला झाला आहे. त्यामुळे तेथून निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. तेथे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रदीप पाटील, माजी आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील, पाटण अर्बन बॅंकेचे उपाध्यक्ष धनंजय ताटे, पंचायत समितीचे माजी सदस्य विजय चव्हाण, युवा उद्योजक सचिन पवार, काँग्रेसचे जगदीश पाटील, भाजपचे गणेश पाटील यांच्यासह अनेकजण सध्या इच्छुक आहेत. त्यामुळे त्या गटातही पालकमंत्री देसाई, सत्यजितसिंह पाटणकर, माजी मंत्री पाटील, राष्ट्रवादीचे नेते ॲड. उंडाळकर यांच्या विचारांच्या उमेदवारातच थेट लढत होणार असल्याचे चित्र आहे.

Satara ZP elections, Tambwe Gat, reserved category seats, local leader influence
Satara ZP Election : अजितदादांना साताऱ्याच्या जिल्हा परिषदेत 'टिकटिक' ऐकायचीय... मकरंदआबांना भाजपला रोखावेच लागेल!

सुपने गण हा खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. त्यातच कऱ्हाडचे सभापतिपदही खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. त्यामुळे पंचायत समिती सभापतिपदाचा उमेदवारच या गणात असणार आहे. सुपने गणातून खुल्या प्रवर्गातून तयारी केलेल्या इच्छुकांच्या ‘सौं’ना यावेळी संधी मिळणार आहे. यापूर्वी बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पाटील यांच्या पत्नी पद्मिनी पाटील यांनी यापूर्वी या गणाचे प्रतिनिधित्व केले. त्यामुळे यावेळीही त्यांची उमेदवारीसाठी वर्णी लागणार की या गणातून नव्या चेहऱ्याला संधी मिळणार? हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल.

गटातील प्रलंबित कामे...

जिल्हा परिषद शाळांना इमारतींची गरज पशुवैद्यकीय दवाखान्याला सोयीसुविधांची आवश्यकता पंचक्रोशीचे दैवत पाठरवाडीतील भैरोबा देवस्थानच्या रस्त्याचे काम गावोगावी सीसीटीव्ही बसविणे आवश्यक बस थांब्यांच्या ठिकाणी पिकअप शेडची आवश्यकता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com