५६ टक्क्यांचा त्यांचा आकडा पहाटेचा, मध्यरात्रीचा की दुपारचा... शिवेंद्रसिंहराजेंचा सवाल

उदयनराजे भोसले Udayanraje Bhosale यांनी काल शिवेंद्रसिंहराजेच Shivendraraje Bhosale माझे मुख्य प्रचारक Star campainer अशी टीका केली होती. त्याला शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे.
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosalesarkarnama

सातारा : उदयनराजेंच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांचा प्रचार होत आहे. त्यांच्या प्रयत्नांतून झालेली चार कामे त्यांनी सांगावीत. ग्रेडसेपरेटरचे काम बोगसच आहे. त्यांनी किती व कुठलाही सर्व्हे आणू देत. त्यांचा ५६ टक्क्यांचा आकडा पहाटेचा, मध्यरात्रीचा की दुपारा आहे, असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी उपस्थित केला.

खासदार उदयनराजे भोसले यांनी काल शिवेंद्रसिंहराजेच माझे मुख्य प्रचारक अशी टीका केली होती. त्याला शिवेंद्रसिंहराजेंनी त्यांच्याच शैलीत उत्तर दिले आहे. ते म्हणाले, उदयनराजेंच्या कार्यपद्धतीमुळेच त्यांचा प्रचार होतो. त्यांनी त्यांच्या प्रयत्नातून आतापर्यंत झालेल्या कामांविषयी बोलावे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Satara : शेतकऱ्यांकडे दूर्लक्ष नको.. अन्यथा, हातात वाडगं घेऊन बसावे लागेल... उदयनराजे भडकले

सातारा शहर, तालुका व जिल्ह्यात जी कामे होतात ती यांच्यामुळे होतात. जी होत नाहीत ती आमच्यासारख्या आमदारांमुळे झाली नाहीत, अशी त्यांची भूमिका असते. त्यांच्यावर टीका करण्याची माझी अजिबात इच्छा नाही. पण, त्यांनी काही गोष्टी मान्य कराव्यात. सातारा विकास आघाडीने गेल्या पाच वर्षात पालिकेत केवळ भ्रष्टाचार केला, हे मान्य करावे.

Shivendraraje Bhosale, Udayanraje Bhosale
Satara : ग्रेडसेपरेटर निरूपयोगी म्हणणाऱ्यांच्या बुद्धीची किव वाटते... खासदार उदयनराजे

साताऱ्यातील ग्रेडसेपरेटरचे काम हे बोगसच आहे. त्यांनी किती व कुठलेही सर्व्हे आणू दाखवले तरी त्यांचा ५६ टक्क्यांचा आकडा हा पहाटेचा, मध्यरात्रीचा की दुपारा आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वरून जाणारी वाहनेही या सर्व्हेत धरलीत काय. पण हे काम चुकीचेच झालेले असून त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण झाली आहे. ग्रेडसेपरेटरच्या कामावर केवळ पैसा खर्च झालाय हे त्यांनी मान्य करावे, असेही शिवेंद्रसिंहराजेंनी नमुद केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com