Trupti Desai : पुण्याला बदनाम केलं म्हणता तर स्वारगेट नेपाळमध्ये आहे का? तृप्ती देसाईंचा रुपाली पाटील ठोंबरेंना सवाल

Trupti Desai On Rupali Thombare Patil : स्वारगेट येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाला आता वेगळे वळण पाहायला मिळत आहे. आरोपीच्या वकीलांनी केलेल्या दाव्यामुळे सध्या टीका होत असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत पुणे नाहकच बदनाम झाले आहे, असे म्हटलं आहे.
Trupti Desai And Rupali Thombare Patil
Trupti Desai And Rupali Thombare Patilsarkarnama
Published on
Updated on

Pune News : स्वारगेट येथे झालेल्या अत्याचार प्रकरणाला आता वेगळे वळण लागताना पाहायला मिळत आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट करत पुणे नाहकच बदनाम झाले आहे. एका संमतीच्या संबंधात व्यवहाराचे पैसे दिले नाही. म्हणून बलात्काराचा आरोप करण्यात आला असल्याचा दावा केला आहे. आरोपीच्या वकीलाने कोर्टात केलेल्या युक्तिवादाच्या आधारावर रूपाली ठोंबरे पाटील यांनी हा दावा केला आहे. त्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी रुपाली पाटील ठोंबरे यांना उत्तर दिलं आहे.

स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला पोलिसांनी कोर्टात हजर केलं आहे. त्यानंतर कोर्टाने आरोपी दत्तात्रेय गाडेला बारा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीला ज्यावेळेस कोर्टात दाखल करण्यात आलं, त्यावेळी आरोपीच्या वकीलांनी हा बलात्कार नसून संबंध असल्याचा दावा केला होता. तसेच हे दोघांच्या संमतीने झाल्याचं सांगितलं होतं. तसेच यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्याचा देखील दावा केला होता. यानंतर आता या आर्ग्युमेंटच्या आधारावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे यांनी पुण्याला नाहक बदनाम केल जातयं असा दावा केला आहे. त्यावर आता तृप्ती देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता कॉमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप)

तृप्ती देसाई म्हणाल्या, स्वारगेट एसटी स्थानकामध्ये जे अत्याचाराचे प्रकरण झाले ते गंभीर आणि संवेदनशील आहे. मात्र त्यानंतर सत्ताधारी पक्षातील काही नेते, काही महिला यासंदर्भात पुण्याला विनाकारण बदनाम गेलं असं म्हणत आहेत तर काहीजण, त्या मुलीने विरोधच केला नाही असे स्टेटमेंट देत आहेत.

Trupti Desai And Rupali Thombare Patil
Trupti Desai : वाल्मिक कराड देखील आजारी, धसांनी त्याचीही जेलमध्ये भेट घ्यावी, तृप्ती देसाईंचा खोचक सल्ला

पुण्याला कोणीही विनाकारण बदनाम केलेलं नाही. स्वारगेट बस स्थानक काही नेपाळमध्ये नाही, ज्या पोलिसांनी आरोपीला शोधण्यासाठी एक लाखाचे बक्षीस ठेवले होते. ते पोलीस काही राजस्थान राज्याचे नाहीत, ज्या न्यायालयाने आरोपीला या प्रकरणात 12 दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे, ते पोलीस काय गोवा राज्याचे नाहीत. यामुळे कोणत्या गंभीर प्रकरणात आपण कशा पद्धतीने रिऍक्ट होत आहे. हे राजकीय व्यक्तींना समजलं पाहिजे असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

काहीजण हा संमतीने झालेला शारीरिक संबंध असल्याचे सांगत आहे. तसंच त्यामध्ये पैशाचा व्यवहार झाला असं म्हणत आहेत. मात्र त्या लोकांचा जरी गृहीत धरलं तरी सार्वजनिक बस डेपोमध्ये त्या बसमध्ये शारीरिक संबंध ठेवण्याची ती जागा आहे का? तो तर सर्वात मोठा गुन्हा आहे.

Trupti Desai And Rupali Thombare Patil
Trupti Desai : धनंजय मुंडे यांचा पापाचा घडा भरत आला, आता मुख्यमंत्री राजीनामा घेणार?

तसेच अडगळीत असलेल्या बसमध्ये जे साहित्य सापडलं ते स्वारगेट बस स्थानकात सापडलं आहे. जे स्वारगेट बसस्थानक पुण्यात आहे. या प्रकरणात तुम्ही गंभीर नाही पण असंवेदनशील आहात हे तरी दाखवू नका, पुणे बदनाम होऊ नये यासाठी आम्ही सगळे रस्त्यावर उतरत आहोत, कारण या प्रकरणानंतर महिला भयभीत झालेल्या आहेत, असं तृप्ती देसाई म्हणाल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com