Udayanraje Bhosale News : शक्तिप्रदर्शन करत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उदयनराजेंनी भरला अर्ज

Satara Loksabha News : उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. या वेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, धैर्यशील कदम, अशोक गायकवाड उपस्थित होते.
Udayanraje Bhosale
Udayanraje BhosaleSarkarnama

Satara Loksabha News : सातारा लोकसभेसाठी महायुतीकडून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करताना जंगी शक्तिप्रदर्शन करत महारॅली काढली. गांधी मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी रॅली झाली. या वेळी भाजप, शिवसेना शिंदे गट, राष्ट्रवादी अजितदादा गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महारॅली पोवई नाका येथे आल्यानंतर हेलिकॉप्टरने दाखल झालेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे Eknath Shide, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis, अजित पवार Ajit pawar यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर उदयनराजेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला. या वेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले Shivendraraje Bhosale, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, धैर्यशील कदम, अशोक गायकवाड उपस्थित होते.

सातारा लोकसभा मतदारसंघातून Satara Loksabha Constituency महायुतीच्या माध्यमातून भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात जंगी शक्तिप्रदर्शन करत महारॅली काढली. जलमंदिर पॅलेस या त्यांच्या निवासस्थानापासून बैलगाडीतून उदयनराजे भोसले, शिवेंद्रसिंहराजे भोसले, अतुल भोसले हे गांधी मैदानावर रॅलीतून आले. तेथून स्वतंत्र सजवलेल्या दोन रथांच्या माध्यमातून महारॅली मार्गस्थ झाली. एका रथावर उदयनराजे भोसलेंसह मान्यवर सहभागी झाले होते. तर दुसऱ्या रथात महायुतीतील घटक पक्षांच्या महिला पदाधिकाऱ्यांसमवेत दमयंतीराजे भोसले याही सहभागी झाल्या होत्या. latest News Satara Politics

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Udayanraje Bhosale
Praniti Shinde News : शक्तिप्रदर्शन करत प्रणिती शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल

गांधी मैदानापासून विराट जनसमुदायाच्या साथीने रॅली राजपथावरून मार्गस्थ झाली. या वेळी उदयनराजे यांच्या समवेत शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, अतुल भोसले, धैर्यशील कदम, आनंदराव पाटील, अशोक गायकवाड, तसेच दमयंतीराजे भोसले, सुरभी भोसले, सुवर्णा पाटील, चित्रलेखा माने कदम, आदींसह मान्यवर सहभागी झाले होते. महारॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, नरेंद्र पाटील, शिवेंद्रसिंहराजे भोसले, महेश शिंदे, आदींचे पोस्टर हातात घेऊन कार्यकर्ते महारॅलीत सहभागी झाले होते. तसेच शिवसेना, भाजपचेच तसेच राष्ट्रवादीचे पोस्टर होते.

सकाळी उदयनराजेंनी ढोल्या गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेतले. तसेच अदालत वाडा येथे जाऊन काका कै. शिवाजीराजे भोसले, काकी कै. चंद्रलेखाराजे भोसले यांच्या प्रतिमेस अभिवादन करून शुभाशीर्वाद घेतले. त्यानंतर जलमंदिर पॅलेसमधील तुळजाभवानी माता तसेच राजमाता कल्पनाराजे भोसले यांचे शुभाशीर्वाद घेतले. यावेळी पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी त्यांचे औक्षण केले. त्यानंतर उदयनराजे अर्ज भरण्यासाठी रवाना झाले.

महारॅली पोवई नाक्यावर असल्यानंतर हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार मकरंद पाटील, जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, पुरुषोत्तम जाधव, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झाले. या वेळी उदयनराजेंचा उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, शंभूराज देसाई उपस्थित होते. या वेळी शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील, महेश शिंदे, धैर्यशील कदम, अशोक गायकवाड उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थित जनसमूहाला संबोधित केले.

R

Udayanraje Bhosale
Mahavikas Aghadi news : महाराष्ट्र दिनाला होणार महाविकास आघाडीचा महामेळावा !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com