
Solapur, 26 June : राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर उमेश पाटील यांची मोहाळचे पक्षाचे माजी आमदार राजन पाटील यांच्याबाबत काय भूमिका आहे? याबाबत उत्सुकता असतानाच त्यांनी पुन्हा एकदा अनगरकर पाटील यांना नाव न घेता डिवचले आहे. उमेश पाटील यांच्या विधानामुळे मोहोळमध्ये नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर उमेश पाटील (Umesh Patil) हे बुधवारी (ता. 25 जून) प्रथमच सोलापूर शहरात आले होते. शहरात त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मोहोळचे माजी आमदार राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील नाते संपूर्ण जिल्ह्याला सर्वश्रूत आहे, त्यामुळे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांच्यातील नाते कसे असणार, याची उत्सुकता होती.
मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि नरखेडचे उमेश पाटील हे एकाच पक्षात असूनही दोघांमधून विस्तवही जात नाही. या दोघांनी एकमेकांवर टीकाटिपण्णी करण्याची एकही संधी आतापर्यंत सोडलेले नाही, त्यामुळे जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर उमेश पाटील यांची राजन पाटील यांच्याबाबत काय भूमिका असणार,याचे औत्सुक्य होते.
उमेश पाटील हे जिल्हाध्यक्ष म्हणून माजी आमदार राजन पाटील यांच्याशी सलोख्याचे धोरण स्वीकारणार की आक्रमक पवित्रा कायम ठेवणार, याची उत्सुकता असतानाच त्यांनी पुन्हा एकदा राजन पाटलांना डिवचले आहे, त्यामुळे नवा उद्भवण्याची शक्यता आहे.
जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर मोहोळमधून माजी आमदार राजन पाटील समर्थकांकडून उमेश पाटील यांच्यावर टीकाटिप्पणी होत आहे, त्याबाबत उमेश पाटील यांनी राजन पाटील यांचे नाव न घेता ते कुटुंबीय आता अदखलपात्र झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर जास्त बोलू नये, अशी भूमिका मांडली आहे. अनगरकर पाटील कुटुंबीयांना अदखलपात्र ठरविल्याने राजन पाटील समर्थकांची भूमिका काय असणार, याची उत्सुकता आहे.
मोहोळच्या राजकारणात उमेश पाटील आणि माजी आमदार राजन पाटील हे एकमेकांचे कट्टर विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी झालेल्या अनगर अप्पर तहसील कार्यालयावरून हे दोघे पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. पक्षाचे तत्कालीन आमदार यशवंत माने आणि राजन पाटील यांच्या विरोधात त्यांनी भूमिका घेतली होती.
विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात उमेश पाटील यांनी काम केले होते, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार यशवंत माने यांचा विधानसभेला पराभव झाला होता, त्यामुळे उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदाचा मान दिल्यामुळे माजी आमदार यशवंत माने आणि राजन पाटील हे नाराज झाले आहेत. या दोघांनाही उमेश पाटील यांच्या नियुक्तीबाबत ‘नो कॉमेंट’ म्हणत बोलणे टाळले होते.
त्यावर उमेश पाटील यांनी राजन पाटील यांचे नाव न घेता ते कुटुंबीय आता बेदखल झाले आहे, त्यामुळे त्यांच्यावर आता जास्त बोलू नये, असेही त्यांनी सांगितले. उमेश पाटील यांच्या या टिपण्णीवर राजन पाटील समर्थकांचे काय उत्तर येते, हे पाहावे लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.