
Baramati, 25 June : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतमोजणीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 17 उमेदवार आघाडीवर होते, त्यामुळे समर्थकांचा चेहऱ्यावर हास्य दिसून येत नव्हते. कारण, ज्यांच्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती, ते ऊस उत्पादक मतदारसंघाच्या बारामती गटातील उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक नितीन सातव हे पहिल्या फेरीच्या मतमोजणीत पिछाडीवर आहेत. पहिल्या फेरीत विरोधकांचे वर्चस्व असलेल्या तीन गटांतील मते मोजली होती. मात्र, पवारांचे वर्चस्व असलेल्या गटातील मतमोजणीला सुरुवात होताच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले. सायंकाळी सहापर्यंत तावरेंनी पिछाडी भरून काढून 650 मतांची आघाडी घेतली होती.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक (Malegaon Sugar Factory Election) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठेची केले होती. विधानसभा निवडणुकीनंतर ते प्रथमच आठवडाभर बारामतीत तळ ठोकून होते, त्यानुसार रणनीती आखत त्यांनी हातातून निसटू पाहणारी माळेगाव कारखान्याची निवडणूक खेचून आणली. उपमुख्यमंत्री पवार यांच्याप्रमाणे त्यांचे शिलेदार नितीन सातव यांच्याही दृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेचे होती. कारण नितीन सातव यांनी माळेगावच्या निवडणुकीत महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
नितीन सातव (Nitin Satav) यांनी ऊस उत्पादक मतदारसंघाच्या बारामती गटातून माळेगाव कारखान्याची निवडणूक लढवली आहे. या गटातून पहिल्या फेरीअखेर तावरे गटाचे वीरसिंह गवारे आणि अजित पवार गटाचे देविदास गावडे हे आघाडीवर होते, तर नितीन सातव यांना 3559 मते मिळाली आहेत. ही मतमोजणी विरोधकांचे प्राबल्य असलेले माळेगाव, सांगवी आणि पणदरे गटातील होती. म्हणजे विरोधकांनी सातवांना टार्गेट केले होते, हे पहिल्या फेरीतच दिसून आले.
दरम्यान, नितीन सातव हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माळेगाव कारखान्यासाठी आखलेली रणनीती राबविण्यात आघाडीवर होते. या निवडणुकीत त्यांनी बऱ्यापैकी सूत्रे हलवली होती, त्यामुळे सातव यांच्या पिछाडीबाबत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हूरहूर लागली होती. मतमोजणी केंद्रात उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत होती.
अखेर बारामती, नीरा वागज, खांडज शिरवली गटातील ऊस उत्पादक मतदारांची मोजणी सुरू होताच सातव यांनी आघाडी तोडण्यास सुरुवात केली. आघाडी कमी हेाताच कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरही हास्य फुलले. बारामती, नीरा वागज आणि खांडज शिरवली गटातून अखेर सातव यांनी विरोधकांची पिछाडी भरून काढत सहा-साडेसहाच्या सुमारास ६५० मतांची आघाडी घेतली आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले.
पसंतीच्या चिन्हासाठी मध्यरात्री गाठले होते निवडणूक कार्यालय
माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पसंतीचे चिन्ह मिळावे; म्हणून हेच नितीन सातव मध्यरात्री एक वाजता निवडणूक कार्यालयात पहिल्यांदा जाऊन रांगेत उभे राहिले हेाते. त्यानंतर आलेले विरोधी पॅनलचे प्रमुख रंजन तावरे यांच्यासोबत त्यांचा पुढे जाण्यावरून वादही झाला होता, त्यावेळी दोन गटांत प्रचंड गोंधळ आणि बाचाबाची झाली होती. शेवटी उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांना येऊन मध्यस्थी करावी लागली होती. मात्र, तेच नितीन सातव आता मागे पडल्याने राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना रुखरुख लागली आहे
पहिल्या फेरीअखेर मतदारसंघनिहाय पॅनेलचे उमेदवार व त्यांना मिळालेली मते पुढीलप्रमाणे
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
रतनकुमार भोसले (अजित पवार गट) : 4117
बापूराव गायकवाड (चंद्रराव तावरे गट) : 3717
इतर मागास प्रवर्ग
नितीनकुमार वामनराव शेंडे (अजित पवार गट) : 4120
रामचंद्र नाळे (चंद्रराव तावरे गट) : 3644
भटक्या जाती जमाती प्रवर्ग
विलास ऋषिकांत देवकाते (अजित पवार गट) : 4269
सूर्याची तात्यासो देवकाते (चंद्रराव तावरे गट) : 3288
महिला राखीव प्रवर्ग
संगीता बाळासाहेब कोकरे (अजित पवार गट) : 2161
राजश्री कोकरे (चंद्रराव तावरे गट) : 2022
ज्योती मुलमुले (अजित पवार गट) : 1959
ऊस उत्पादक मतदारसंघ
माळेगाव गट
रणजीत जाधवराव (अजित पवार गट) : 4332
बाळासाहेब तावरे (अजित पवार गट) : 3803
राजेंद्र बुरुंगले (अजित पवार गट) : 3707
संग्राम काटे (चंद्रराव तावरे गट) : 3425
रमेश गोफणे (चंद्रराव तावरे गट) : 2963
रंजन तावरे (चंद्रराव तावरे गट) : 3587
पणदरे गट
तानाजी कोकरे (अजित पवार गट): 3803
योगेश जगताप (अजित पवार गट) : 4110
स्वप्निल जगताप (अजित पवार गट) : 3716
रोहन कोकरे (चंद्रराव तावरे गट) : 3314
रणजीत जगताप (चंद्रराव तावरे गट) : 3050
सत्यजित जगताप (चंद्रराव तावरे गट) : 3247
सांगवी गट
गणपत खलाटे (अजित पवार गट) : 4115
विजय तावरे (अजित पवार गट) : 3645
वीरेंद्र तावरे (अजित पवार गट) : 3332
चंद्रराव तावरे : 4041
संजय खलाटे (चंद्रराव तावरे गट) : 2961
रणजीत खलाटे (चंद्रराव तावरे गट) : 3747
खांडज शिरवली गट
प्रताप आटोळे (अजित पवार गट) : 3995
सतीश फाळके (अजित पवार गट) : 4117
मेघा शाम पोंदकुले (चंद्रराव तावरे गट) : 3145
विलास सस्ते (चंद्रराव तावरे गट) : 3285
नीरा वागज गट
जयपाल देवकाते (अजित पवार गट) : 3862
अविनाश देवकते (अजित पवार गट) : 4289
केशव देवकाते (चंद्रराव तावरे गट) : 3179
राजेश देवकते (चंद्रराव तावरे गट) : 3254
बारामती गट
नितीन सातव (अजित पवार गट) : 3559
देविदास गावडे (अजित पवार गट) : 3898
वीरसिंह गवारे (चंद्रराव तावरे गट) : 3740
गुलाबराव गावडे (चंद्रराव तावरे गट) : 3542
ब वर्ग प्रवर्ग
अजित अनंतराव पवार -91
भालचंद्र बापूराव देवकाते (चंद्रराव तावरे गट) : 10 मते
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.