upsc success story : वडिलांचं हरपलं छत्र, आईनं मोलमजुरी करून दिलं बळ, अखेर पट्ट्यानं सर केलं UPSC चं शिखर

sangli pravin kolpe clears upsc : नुकताच यूपीएससीचा निकाल लागला असून सांगली जिल्ह्यातील खानापूर बलवडी येथील दोघांनी यश मिळवत जिल्ह्याचा झेंडा फडकवला आहे.
upsc success story AI Photo
upsc success story AI Photosarkarnama
Published on
Updated on
Summary

• यूपीएससी परीक्षेत सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील मिटकी गावातील प्रवीण कोळपे याने सहाव्या प्रयत्नात यश मिळवले.

• वडिलांच्या निधनानंतर आईने शेतात काम करून आणि मोलमजुरी करून त्याला शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

• त्याच्या यशानंतर मिटकी गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

sangli News : जिल्ह्यातील संकेत सदाशिव कुंभार (बलवडी भा, ता. खानापूर) आणि प्रवीण उत्तम कोळपे (मिटकी, ता. आटपाडी) या दोघांनी आज जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत (यूपीएससी) परीक्षेत यश मिळवले. संकेत कुंभार याने ५३९, तर प्रवीण कोळपे याने ५८४ वे स्थान मिळवले. या दोघांनी ‘यूपीएससी’ परीक्षेत जिल्ह्याचा झेंडा फडकवला.

‘यूपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण होणारा संकेत कुंभार हा गावातील पहिला विद्यार्थी आहे. त्याचे वडील सदाशिव कुंभार रोहा येथे माध्यमिक शिक्षक आहेत. तर आई जयश्री गृहिणी आहेत. संकेत याचे प्राथमिक शिक्षण रोहा येथील म. स. गांगल प्राथमिक मराठी शाळेत झाले. माध्यमिक शिक्षण मेहंदळे हायस्कूलमध्ये झाले.

लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी महाविद्यालयातून मॅकेनिकल इंजिनिअरची पदवी घेतल्यानंतर दिल्ली येथे व्हिजन स्पर्धा परीक्षा केंद्रात ‘यूपीएससी’ची तयारी केली. तिसऱ्या प्रयत्नात केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत उत्तीर्ण झाले. ‘ऑनलाइन अन्वेषण’ या राष्ट्रीय संशोधन स्पर्धेत त्याने बेसिक सायन्स विभागातून इंदूर येथे देशपातळीवरील राष्ट्रीय स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला होता. चेन्नई येथील स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला होता.

upsc success story AI Photo
UPSC Success Story : टेक्निशियनचा मुलगा बनला देशाचा UPSC टॉपर! 26 व्या वर्षी अनुज अग्निहोत्रीने इतिहास रचला

सहाव्या प्रयत्नात प्रवीणचे यश

आटपाडी तालुक्यातील मिटकी या छोट्याशा गावातील प्रवीण कोळपे याने जिद्दीने सहाव्या प्रयत्नात ‘यूपीएससी’च्या यशाचं शिखर सर केलं आहे. प्रवीणचे प्राथमिक शिक्षण मिटकीतच झाले. माध्यमिक शिक्षण खरसुंडीच्या सिद्धनाथ विद्यालयातून पूर्ण केले. त्यानंतर सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये उच्च माध्यमिक आणि आटपाडीच्या श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयातून त्याने बीएस्सी पूर्ण केली.

पदवी घेतानाच त्याने कलेक्टर होण्याचे स्वप्न वडिलांनी बघितले होते. त्यासाठी वडिलांनीच आग्रह धरून दिल्लीला अभ्यासासाठी पाठवले. दरम्यान, २०२१ मध्ये त्याच्या वडिलांचे छत्र हरपले. पण, आईने स्वतःच्या शेतात राबून आणि लोकांच्या शेतात मोलमजुरी करून आईने प्रवीणला प्रोत्साहन दिले. त्याच्या यशाने मिटकी येथे परिसरात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

‘यूपीएससी’त यश मिळवावे हे माझ्या वडिलांचे स्वप्न होते. त्याला आईच्या कष्टाने बळ मिळाले. आज आईच्या कष्टाचे चीज केल्याचे आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण झाल्याचा अभिमान वाटतो.

प्रवीण कोळपे

केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होण्याचे स्वप्न लहानपणापासून पाहिले होते. ते पूर्ण झाले आहे. ‘यूपीएससी’ परीक्षा पास होण्यासाठी मला आई-वडिलांनी प्रोत्साहन दिले. शिक्षक व मित्रांनी सहकार्य केले.

संकेत कुंभार

upsc success story AI Photo
UPSC Success Story: बाप शेतकरी, पोरगं झालं ‘क्लास वन’ अधिकारी! शिकवणी न लावता असं केलं अभ्यासाचं नियोजन

FAQs :

1. प्रवीण कोळपे कोण आहेत?
प्रवीण कोळपे हे सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील मिटकी गावातील युवक असून त्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे.

2. प्रवीण कोळपे यांनी कितव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली?
त्यांनी सहाव्या प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत यश मिळवले.

3. त्यांच्या यशामागे कोणाचा मोठा वाटा आहे?
त्यांच्या आईने शेतात काम करून आणि मोलमजुरी करून त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले.

4. प्रवीण कोळपे यांच्या वडिलांचे काय स्वप्न होते?
त्यांच्या वडिलांचे स्वप्न होते की प्रवीणने कलेक्टर व्हावे.

5. त्यांच्या यशानंतर गावात कसा आनंद साजरा झाला?
मिटकी गावात पेढे वाटून आणि फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com