Kolhapur News : मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांपैकी एका मतदारसंघाची भाजपसाठी मागणी केल्यानंतर शिंदे गटातील अस्वस्था दिसू लागली आहे. 48 पैकी 45 लोकसभा मतदारसंघात युतीचे खासदार असावेत,असे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत असल्याने कोणत्याही परिस्थितीत आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. मात्र भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानंतर एक जागा भाजपकडे यावी अशी मागणी होत आहे.
सध्या कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघावर शिंदे गटाचे खासदार विराजमान आहेत. पण शिवसेनेत गट पडल्यानंतर या दोन्ही खासदारांवर नाराजी व्यक्त केली जाते. त्यातून भाजपने केलेला अंतर्गत सर्व्हेत जनतेचा कौल आज ही भाजपच्या बाजूने असल्याचे सांगत आहे. त्यामुळे या दोन पैकी एक जागा भाजपकडे असावी, अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यावर खासदार धैर्यशील माने यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरातील दोन लोकसभा मतदारसंघांपैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या दाव्यानंतर खासदार धैर्यशील माने यांनी आपली प्रतिक्रिया करताना हे दोन मतदारसंघ शिंदे गटाकडेच राहतील असा दावा केला आहे.
धैर्यशील माने (Dhairyasheel Mane) म्हणाले, राजकीय परिस्थितीप्रमाणे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत. मात्र, लोकसभेची ही चर्चा वरिष्ठ पातळीवरती नेते करत असतात. शिवसेना (Shivsena) आणि भाजपचे युती सरकार सध्या याठिकाणी आहे. त्यामध्ये आता राष्ट्रवादी सामील झाली आहे. त्यामुळे निश्चितच या जागावाटप बाबत पार्लमेंटरी कमिटीमध्ये मतदारसंघनिहाय चर्चा होईल.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
त्यानुसार याबाबत निर्णय होईल, असे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. पण आजच्या घडीला हे दोन्ही मतदारसंघ शिवसेनेकडे आहेत, शिवसेनेकडेच राहतील असा विश्वास सुद्धा खासदार माने यांनी व्यक्त केला.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.