MLA opportunity : हळवणकर, मंडलिकांच्या रेसमध्ये आप्पांनी सावकार मादनाईकांना ढकलले; विधान परिषदेला आमदारकीची संधी मिळणार का?

Halwankar vs Mandlik race News : शिरोळमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पाठिंबा दिला.
Sawkar Madannaik, Sanjay Mandlik, Suresh halwankar
Sawkar Madannaik, Sanjay Mandlik, Suresh halwankar Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : विधानसभा निवडणुकीत पडद्यामागच्या हालचालींचा फायदा महायुतीच्या उमेदवारांना झाला. जिल्ह्यात दहा उमेदवार निवडून आले. तर शिरोळ आणि इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात गेल्या वेळेच्या उमेदवाराने महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. शिरोळमधून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी संघटनेच्या उमेदवाराला पाठिंबा न देता महायुतीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना पाठिंबा दिला. तर इचलकरंजीमधून भाजपचे माजी आमदार सुरेश हळवणकर यांची समजूत काढून आमदार राहुल आवाडे यांना उमेदवारी दिली.

राज्यपाल नियुक्त उर्वरित पाच आमदारांच्या निवड यादीत भाजपकडून (BJP) सुरेश हळवणकर यांच्या नावाची शक्यता आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी खासदार संजय मंडलिक यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण आता या रेसमध्ये माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांना देखील ढकलले आहे.

Sawkar Madannaik, Sanjay Mandlik, Suresh halwankar
ShivSena UBT : पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी ठाकरेसेनेच्या हालचाली, उद्धव ठाकरे लवकरच पुणे दौऱ्यावर

विधानसभा निवडणुकीत सावकर मादनाईक यांनी महायुती पुरस्कृत शाहू आघाडीचे उमेदवार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा प्रचार करत शेतकरी संघटनेचे उमेदवार उल्हास पाटील यांच्या विरोधात प्रचार केला. त्यामुळे यड्रावकर यांचा विजय झाला. यड्रावकर यांना निवडून आणण्यात मादनाईक यांनी मोठे योगदान दिले. त्यामुळे आता आमदार यड्रावकर यांची विधान परिषदेसाठी मादनाईक यांना संधी देऊन तुम्ही शब्द पाळण्याची वेळ आली आहे. आता सर्वानी मिळून मादनाईक यांना आमदार करूया, असा निर्धार माजी आमदार महादेवराव महाडिक (Mahadevrao Mahdaik) यांनी केला. जयसिंगपूर येथील एका खासगी कार्यक्रमात ते बोलत होते.

Sawkar Madannaik, Sanjay Mandlik, Suresh halwankar
Pramod Sawant criticism : सोनिया गांधींच्या वक्तव्यावरुन फुटले नव्या वादाला तोंड; प्रमोद सावंतांची टीका

यावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांची सावकार मादनाईक यांच्या निवासस्थानी भेट झाली. महाडिक म्हणाले, 'मादनाईक यांनी विधानसभा निवडणुकीत शब्द पाळला. त्यामुळे ठरल्यानुसार त्यांना संधी मिळायला हवी. मी स्वतः त्यांच्या पाठीशी ठाम असल्याचं महाडिक यांनी सांगितले.

Sawkar Madannaik, Sanjay Mandlik, Suresh halwankar
Mahayuti Dispute : शिवसेनेकडून ऑपरेशन टायगरची चर्चा; पण बावनकुळेंची शिरसाटांना तंबी, म्हणाले, ‘रस्त्यावरची चर्चा...’

यावेळी मादनाईक यांनी दोन वेळा जिल्हा परिषद, बांधकाम सभापती पदावर काम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी काम केले आहे. माजी आमदार महाडिक यांची मध्यस्थी लक्षात घेऊन आमदार यड्रावकर यांना मदत केली असल्याचे स्पष्ट केले.

Sawkar Madannaik, Sanjay Mandlik, Suresh halwankar
BJP Politics : पक्की खबर! शिवसेना ठाकरेंचे सहा खासदार भाजप फोडणार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com